Bhondu Baba raped a minor girl

आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडलं आणि…

क्राईम महाराष्ट्र

यवतमाळ : यवतमाळमधील बेलोरा येथे एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षकाने शाळेतील एका अल्पवयीन माजी विद्यार्थिनीवर शाळेतच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गावातील लोकांनी आज (७ ऑगस्ट) दुपारी या शिक्षकास विद्यार्थिनीवर अत्याचार करताना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी या शिक्षकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याची दुचाकी देखील जाळून टाकली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, अरूण राठोड (५५) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून तो बेलोरा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहे. विशेष म्हणजे हा शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. ग्रामस्थांना हा शिक्षक विद्यार्थिनीवर अत्याचार करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी या शिक्षकाला रंगेहाथ पकडून शाळेत डांबले. त्यानंतर या शिक्षकाला बेदम चोप दिला.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर ग्रामस्थांनी शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत शिक्षक गंभीर जखमी झाला असून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विद्यार्थिनीवर अत्याचार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत