corona virus
कोरोना महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, ‘या’ शहरांमध्ये कडक निर्बंध

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे काही जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले. तरीदेखील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने चिंता वाढली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसात 20 हजारांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात 97 हजार 638 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील मृत्यूदर हा 2.36 टक्क्यांवर पोहोचला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुणे :

पुण्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये वाढ होत आहे. आता पुण्यातील कंटेनमेंट झोनची संख्या 62 वर पोहोचली आहे.

मुंबई :

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. अनेक इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला निर्बंध कडक करण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे :

ठाण्यात कोरोनाग्रस्तांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. त्यामुळे कोरोनाला अटकाव करण्यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात 16 ठिकाणं कोरोना हॉटस्पॉट निश्चित करण्यात आली असून या 16 हॉटस्पॉटमध्ये येत्या 31 मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाऊन असेल.

औरंगाबाद :

औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या 11 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

नाशिक :

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख कायम आहे. त्यामुळे येथेही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. नाशिक आणि मालेगावमध्ये सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहणार आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हााधिकाऱ्यांनी दिली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत