Important news for SBI debit card customers

SBI चे डेबिट कार्ड वापरणार्‍या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी

काम-धंदा

आपण भारतीय स्टेट बँक (SBI) चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील सर्वात मोठी बँक SBI ने ट्वीट करून आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की जर त्यांना आंतरराष्ट्रीय व्यवहारात अडचणी येत असतील तर त्यांचे पॅनकार्डसंबंधित तपशील त्वरित बँक खात्यात अपडेट करावे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे की, “आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये त्रास होत आहे? एसबीआय डेबिट कार्डद्वारे कोणत्याही त्रासाशिवाय परकीय व्यवहारांसाठी बँक रेकॉर्डसह आपले पॅन तपशील अपडेट करा.

एसबीआय खात्यात पॅन कार्ड कसे लिंक करावे :
कोणताही एसबीआय ग्राहक एसबीआय खात्याबरोबर पॅनकार्ड ऑफलाइन किंवा ऑनलाइन दोन्ही पद्धतीने जोडू शकतो.

  1. पॅनला खात्याशी लिंक करण्यासाठी www.onlinesbi.com वर जा आणि ‘My Accounts’ पर्यायाखाली Profile-Pan Registration वर क्लिक करा.
  2. यानंतर आपल्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल. नवीन पृष्ठावर, आपला खाते क्रमांक निवडा आणि नंतर पॅन क्रमांक प्रविष्ट करा.
  3. यानंतर सबमिट बटणावर क्लिक करुन तुम्ही तुमच्या अकाउंट नंबरमध्ये पॅन नंबर लिंक करू शकता.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत