employees provident fund organisation epfo maintains interest rate
काम-धंदा

सरकारचा मोठा निर्णय, नोकरदारांना पीएफवर मिळेल पूर्वीइतका व्याजदर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 6 कोटीहून अधिक नोकरदारांना मोठा दिलासा दिला आहे. EPFO ने पीएफ वरील व्याज दर जाहीर केला आहे. EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर कायम ठेवला आहे. पीएफवर 8.5 टक्के दराने व्याज दिले जाईल. ईपीएफ व्याजदराबाबत निर्णय आज श्रीनगर येथे झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोरोनामुळे व्याज दरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, व्याजदरामध्ये कोणताही बदल न झाल्यामुळे नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे होते की कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 2020-21 व्याज दरात कपात केली जाऊ शकते. पीएफवरील व्याज दर आधीच सात वर्षांच्या नीचांकावर आहेत. २०१९-20 या आर्थिक वर्षासाठी सरकारने व्याज दर 8.5 टक्के देण्याचे निश्चित केले होते, जे सात वर्षातील सर्वात कमी होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत