IND vs ENG 3rd Test: India win by 10 wickets

IND vs ENG 4th test : इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांमध्ये गुंडाळला

क्रीडा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी आणि शेवटची कसोटी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 55 धावा केल्या. त्याचबरोबर टीम इंडियाकडून फिरकीपटू अक्षर पटेलने 4 आणि रविचंद्रन अश्विनने 3 गडी बाद केले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

इंग्लंडकडून बेन स्टोक्सशिवाय डॅन लॉरेन्सने 46, ऑली पोपने 29 आणि जॉनी बेअरस्टोने 28 धावा केल्या. अक्षर पटेलने ४ गडी बाद केले. त्याच्याशिवाय रविचंद्रन अश्विनने 3 आणि मोहम्मद सिराजने 2 गडी बाद केले. अक्षरने जॅक क्रॉली, डोम सिब्ली, डॅन लॉरेन्स आणि डोम बेस यांना बाद केले. सिराजने बेअरस्टो आणि जो रूटला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अश्विनने ओली पोप आणि बेन फॉक्सला बाद केले. वॉशिंग्टन सुंदरला एक विकेट मिळाली. त्याने बेन स्टोक्सला 55 धावांवर एलबीडब्ल्यू केले. स्टोक्सने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 24 वे अर्धशतक ठोकले.

इंग्लंडने सुरुवातीला 5 षटकांत 10 धावा केल्या. नंतर विराट कोहलीने सहाव्या षटकात फिरकीपटू अक्षर पटेलला पाठवले. त्याने कोहलीचा निर्णय योग्य ठरवत ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर डोम सिबलीला त्रिफळाचित केले. सिबलीला केवळ 2 धावा करता आल्या. आपल्या पुढच्या षटकात अक्षरने जॅक क्रोलीला (9) झेलबाद केले. मोहम्मद सिराजने हा झेल टिपला.

इंग्लंडला तिसरा धक्का मोहम्मद सिराजने 30 धावांवर दिला. त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला मागे पाठवले. यानंतर जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी 48 धावांची भागीदारी करत डाव सावरला. बेअरस्टोनंतर स्टोक्सने ओली पोप याच्यासह 43 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्टोक्स बाद झाला. पोपने डॅम लॉरेन्सबरोबर सहाव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. इंग्लंडला नंतर कोणतीही मोठी भागीदारी करता आली नाही आणि इंग्लंडचा डाव २०५ धावांमध्ये गुंडाळला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत