Staff cut off newborn’s head, leave it inside woman’s womb in Pakistan

भयंकर! नवजात बाळाचे डोके तुटून आईच्या पोटातच राहिले, पाकिस्तानमध्ये आरोग्य कर्मचार्‍यांचा निष्काळजीपणा

ग्लोबल

पाकिस्तान : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. या आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांनी एका नवजात बाळाचे डोके कापून ते आईच्या पोटातच सोडले, ज्यामुळे 32 वर्षीय हिंदू महिलेचा जीव धोक्यात आला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, “थरपारकर जिल्ह्यातील दूरवरच्या खेड्यात राहणारी हिंदू महिला तिच्या भागातील ग्रामीण आरोग्य केंद्रात (आरएचसी) गेली होती, परंतु स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने अननुभवी कर्मचाऱ्यांमुळे तिला मोठ्या आघाताला सामोरे जावे लागले. राहिल सिकंदर, जे जामशोरो येथील लियाकत युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल अँड हेल्थ सायन्सेस (LUMHS) च्या स्त्रीरोग विभागाचे प्रमुख आहेत, त्यांनी सांगितले की RHC कर्मचार्‍यांनी रविवारी केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये मातेच्या पोटातील नवजात बाळाचे डोके कापले आणि ते तिच्या पोटात तसेच सोडले.

जेव्हा महिलेला जीवघेण्या परिस्थितीचा सामना करावा लागला तेव्हा तिला तातडीने मिठी येथील रुग्णालयात नेण्यात आले जेथे तिच्यावर उपचार करण्यासाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. अखेरीस, तिच्या कुटुंबीयांनी तिला LUMHS मध्ये आणले, जेथे नवजात अर्भकाचे उर्वरित शरीर आईच्या उदरातून बाहेर काढण्यात आले आणि तिचा जीव वाचला, असे राहिल सिकंदर यांनी सांगितले. बाळाचे डोके आत अडकले होते आणि आईचे गर्भाशय फाटले होते. अशा परिस्थितीत तिचा जीव वाचवण्यासाठी त्यांना तिचे पोट शस्त्रक्रिया करून उघडावे लागले आणि बाळाचे डोके बाहेर काढावे लागले.

या भयानक घटनेनंतर, सिंध हेल्थ सर्व्हिसेसचे महासंचालक डॉ जुमन बाहोटो यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले. ते म्हणाले की, चौकशी समित्या चाचरो येथील आरएचसीमध्ये विशेषत: स्त्रीरोगतज्ज्ञ आणि महिला कर्मचाऱ्यांची अनुपस्थितीत काय घडले हे शोधून काढेल. महिला स्ट्रेचरवर असताना तिचा व्हिडिओ काढल्यामुळे महिलेला मानसिक आघात सहन करावा लागल्याच्या अहवालाचीही चौकशी समित्या करतील. जुमान पुढे म्हणाले कि, “काही कर्मचाऱ्यांनी स्त्रीरोग वॉर्डमधील मोबाईल फोनवर तिचे फोटो काढले आणि ते फोटो वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केले.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत