Somalia hotel attack similar to 26/11, 15 people dead, many injured

सोमालियातील हॉटेलमध्ये 26/11 सारखा हल्ला, 14 तासांनंतरही चकमक सुरूच, 15 जण ठार

ग्लोबल

मुंबई : सोमालियात मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलप्रमाणेच सोमालियाची राजधानी मोदादिशू येथील हॉटेल हयातवर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी आधी हॉटेलबाहेर स्फोट केला, त्यानंतर गोळीबार करत ते हॉटेलमध्ये घुसले. या हल्ल्यात आतापर्यंत १5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तब्बल 14 तासांनंतरही सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हे सर्व दहशतवादी अल शबाब या संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी सोमालियातील एका हॉटेलवर हल्ला केला. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. दहशतवाद्यांनी हयात हॉटेलवर गोळीबार केला आणि दोन कारचा स्फोट केला. त्याचवेळी अल-कायदाशी संलग्न असलेल्या अल-शबाब गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

दहशतवादी अजूनही हॉटेल हयातमध्ये आहेत आणि सुरक्षा दलांची त्यांच्याशी चकमक सुरू आहे. हॉटेल हयातवरील हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी 14 तासांनंतरही चकमक सुरू आहे आणि आतापर्यंत दहशतवाद्यांनी हॉटेलवर ताबा मिळवला आहे. हयात हॉटेलमध्ये हे बंदूकधारी घुसण्याच्या एक मिनिट आधी मोठा स्फोट झाला, असेही सांगण्यात आले.

या चकमकीत मोगादिशूचे गुप्तचर प्रमुख मुहिद्दीन मोहम्मद यांच्यासह दोन सुरक्षा अधिकारी जखमी झाले आहेत. त्याचवेळी, घटनेच्या वेळी उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या स्फोटानंतर काही मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. या स्फोटांमुळे सुरक्षा दलाचे काही सदस्य आणि नागरिक जखमी झाले. या परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. हल्ल्यात बळी पडलेल्यांमध्ये हॉटेलच्या मालकासह व्यापारी, मौलवी, सरकारी कर्मचारी यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत