Mumbai Police
महाराष्ट्र मुंबई

मुंबईत पुन्हा 26/11 सारख्या हल्ल्याची धमकी, पाकिस्तानी नंबरवरून पोलिसांना आला मेसेज….

मुंबई : मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रणाला 26/11 सारख्या हल्ल्याच्या धमक्या मिळाल्याने खळबळ उडाली आहे. धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पाकिस्तानी नंबरवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीने वाहतूक नियंत्रण विभागाच्या व्हॉट्सऍप क्रमांकावर मेसेज पाठवला आहे, त्यात मुंबईत २६/११ सारखा हल्ला घडवून आणण्याची धमकी दिलेली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मेसेजकर्त्याने सांगितले की, जर तुम्ही त्याचे लोकेशन ट्रेस केले तर ते भारताबाहेर दिसेल आणि स्फोट मुंबईत होणार आहे. या धमकीमध्ये असंही लिहण्यात आलं आहे की, भारतात ६ दहशतवादी हे काम पार पाडणार आहेत. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून इतर यंत्रणांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे संशयास्पद बोट आढळून आल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानंतर अशी दहशतवादी हल्ला होण्याची धमकी मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई सध्या अलर्ट मोडवर आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत