मुंबई : सोमालियात मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेलप्रमाणेच सोमालियाची राजधानी मोदादिशू येथील हॉटेल हयातवर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी आधी हॉटेलबाहेर स्फोट केला, त्यानंतर गोळीबार करत ते हॉटेलमध्ये घुसले. या हल्ल्यात आतापर्यंत १5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तब्बल 14 तासांनंतरही सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. […]

