मुंबई : मुंबईतील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना आता बसमधून प्रवास करण्यासाठी कमी भाडे मोजावे लागणार आहे. ही सुविधा फक्त मुंबईतील अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल. 22 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.
मुंबईतील अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना बसमधून प्रवास करण्यात सवलत मिळणार आहे. बेस्टने यासाठी विशेष योजना आखली आहे. सर्व विद्यार्थ्यांना पास बनवून सवलतीच्या दरात बेस्ट बसमध्ये प्रवास करता येणार आहे. 22 ऑगस्टपासून म्हणजेच सोमवारपासून विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. पूर्वीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट बसेसच्या 100 ट्रिपच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी 999 रुपये मोजावे लागत होते. मात्र आता फक्त 500 रुपये मोजावे लागणार आहेत.
Good news for students
BEST has started a new student concession bus pass for graduation and post-graduation students. They will get pass for 100 trips worth Rs 999 at Rs 500.
The passes can be applied online on “BEST Chalo app” or from nearest bus depot from 22nd August 2022.— BEST Bus Transport (@myBESTBus) August 19, 2022
बेस्टच्या या नव्या घोषणेमुळे विद्यार्थ्यांना 50 टक्के लाभ मिळणार आहे. बेस्टच्या म्हणण्यानुसार आता तीन महिन्यांच्या पासची किंमत 1500 रुपये आणि सहा महिन्यांच्या पासची किंमत 2500 रुपये ठेवण्यात आली आहे. 22 ऑगस्टपासून हे पास जारी केले जातील. बेस्ट चलो ऍपद्वारे विद्यार्थी हा पास ऑनलाइन अर्ज करू शकतात.
नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात यूजी आणि पीजी विद्यार्थ्यांना बस पास मिळायला हवेत, असे सांगितले होते. त्यानंतर आता बेस्टने ते सुरू केले आहे.




