Extreme Cold Weather Hits China Ultramarathon, Kills 21 Runners

बापरे! खराब हवामानामुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या २१ स्पर्धकांचा मृत्यू

ग्लोबल

बीजिंग : चीनमध्ये खराब हवामानामुळे १०० किलोमीटर क्रॉस-कंट्री पर्वतीय मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या २१ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गांसु प्रांतात एक पर्यटन स्थळ असलेल्या यल्लो रिव्हर स्टोन फॉरेस्टमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या मॅरेथॉनमध्ये एकूण १७२ जण सहभागी झाले होते. सकाळपर्यंत मृतांची संख्या २१ झाली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले अन्य १५१ जण सुरक्षित आहेत. त्यातील आठ जणांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. शनिवारी दुपारी एक वाजता मॅरेथॉन मार्गावरील उंच भागातील २० ते ३१ किमी अंतराच्या परिसरातील हवामान खराब झाले. या भागात जोरदार वारे वाहत होते आणि त्यातच हिमवृ्ष्टी देखील झाली. त्यामुळे वातावरणातील तापमान अचानकपणे कमी झाले. त्याच्यामुळे अनेक स्पर्धकांना त्रास झाला. दरम्यान, काही स्पर्धक बेपत्ता झाल्याचे समजल्यानंतर स्पर्धा थांबवण्यात आली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत