RTPCR testing no longer requires swabs through the nose and mouth

RTPCR चाचणीसाठी नाक आणि तोंडातून स्वॅब घेण्याची गरज नाही, वापरणार ‘ही’ सोपी पद्धत

कोरोना नागपूर महाराष्ट्र

नागपूर : कोरोना चाचणी करवून घेण्यासाठी RT PCR चाचणी करावी लागते, त्यासाठी नाक आणि तोंडातील स्वॅब घेतला जातो. मात्र नाकातून आणि तोंडातून हा स्वॅब घेणं ही प्रक्रिया त्रासदायक असते. यावर आता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) उपाय शोधला आहे. आता सलाइनच्या पाण्याने गुळणी केल्यास व हेच पाणी सॅम्पल म्हणून संकलित केल्यास त्याद्वारे चाचणी केली जाऊ शकते. ही प्रक्रिया सोपी असून याद्वारे पैशांची व मनुष्यबळाचीही बचत होणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नीरीच्या व्हायरॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णा खैरनार यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले कि, “नीरीने सलाइन गार्गल RT PCR टेस्ट हे तंत्र विकसित केले आहे. यामुळे आता नाका-तोंडातून स्वॅब संकलित करण्याची गरज नाही. चाचणी करणाऱ्या व्यक्तीला सलाइन पाणी दिले जाईल. त्याने १५ सेकंदांसाठी संपूर्ण घशातून गुळणी (गार्गल) करणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील १५ सेकंद पाणी तोंडात ठेवणे अपेक्षित आहे. त्यानंतर हे पाणी त्या व्यक्तीने एका ‘व्हेसल’मध्ये थुंकावे. हेच पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाईल. संबंधित व्यक्ती करोना बाधित असल्यास त्याच्या तोंडातील विषाणू या पाण्यात संकलित होतो आणि ही चाचणी शंभर टक्के शास्त्रीय दृष्टीकोनातून पार पडते.”

युवक आंघोळीसाठी नदीपात्रात उतरला आणि अनर्थ घडला…

नीरीने एक विशिष्ट द्रव्य तयार केले आहे. या द्रव्याच्या आधारे फारच कमी वेळात तपासणी पूर्ण होते. यामुळे ‘आरएनएन एक्सट्रॅक्शन कीट’ची गरज नसून आता मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होणार आहे. एकूणच या तंत्रामुळे स्वॅब घेण्यासाठी लागणारा वेळ व मनुष्यबळही वाचणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेसुद्धा नीरीच्या या तंत्राला मान्यता दिली आहे. परिषदेने नीरीला सूचना केल्या आहेत की देशातील इतर महत्त्वाच्या प्रयोगशाळांनासुद्धा या तंत्राचे प्रात्याक्षिक द्यावे, असे खैरनार यांनी पुढे सांगितले.

क्रिकेटपटू कुलदीप यादवने कोरोना लस घेतली, पण सुरु झाला नवा वाद

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझातील एकमेव कोरोना चाचणी लॅब उद्धवस्त

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत