भारताची पहिली कोरोना लस ‘कोविशिल्ड’ लवकरच बाजारात उपलब्ध होईल, असा दावा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कोविशिल्ड ही पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे.
यापूर्वी या लसीची चाचणी पूर्ण होण्यासाठी 7 ते 8 महिने लागतील असं सांगितले जात होते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी बिझनेस टुडेला मुलाखत देताना सांगितले, कि भारत सरकारने आम्हाला विशेष संशोधन प्राधान्य परवाना दिला आहे. तिसर्या टप्प्यातील चाचणीचा पहिला डोस देण्यात आला आहे. दुसरा डोस 29 दिवसांनी दिला जाईल. चाचणीचा अंतिम डेटा दुसरा डोस दिल्यानंतर लवकरच येईल. यानंतर आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर आम्ही कोविशिल्डला व्यावसायिक वापरासाठी बाजारात आणण्याचे विचार करत आहोत, असे ते म्हणाले.
केंद्र सरकार सीरम इन्स्टिट्यूटकडून 68 कोटी लस खरेदी करणार आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय लसीकरण अभियानांतर्गत भारतीयांना मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आहे.




