Bhavana Gandhi's father died due to Corona

‘तारक मेहता..’ फेम टप्पू म्हणजेच भव्य गांधीच्या वडिलांचे कोरोनाने निधन

कोरोना मनोरंजन

नवी दिल्ली : ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील टप्पूची भूमिका निभावलेला अभिनेता भव्य गांधी याचे वडील विनोद गांधी यांचे निधन झाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे भव्यचे वडील विनोद गांधी यांचे निधन झाले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मीडिया रिपोर्टनुसार, भव्य गांधीच्या वडिलांना नुकतीच कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ते व्हेंटिलेटरवर होते. विनोद गांधी 10 दिवसांपासून कोरोनाविरुद्ध लढत होते, पण अखेर त्यांचे निधन झाले. त्यांच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी अचानक कमी झाली, त्यामुळे मंगळवारी त्यांचे निधन झाले. भव्यच्या वडिलांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भव्य आणि मोठा मुलगा आहे, जो विवाहित आहे.

भव्य गांधी सध्या टेलिव्हिजनच्या दुनियेपासून दूर गुजराती चित्रपटांमध्ये काम करत आहेत. त्याने टिपेंद्र लाल गाडा ऊर्फ टप्पूची व्यक्तिरेखा साकारली होती. नऊ वर्ष काम केल्यानंतर 2017 मध्ये त्याने ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिका सोडली. शो सोडताना त्याने सांगितले की त्याला नवीन काही करायला मिळत नव्हतं. म्हणून त्याने शो सोडला. भव्य गांधीचे आजही ‘तारक मेहता का उलटा चष्मा’च्या सहकलाकारांसोबत चांगले संबंध आहेत. तो ‘दया बेन’ म्हणजेच दिशा वाकाणी, दिलीप जोशी आणि समय शहा यांच्या संपर्कात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत