भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात सोलापुर मधील बार्शी शहर पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बार्शीतील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाषण करताना भाजप नेते नारायण राणे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. नारायण राणे यांनी त्याला प्रत्यूतर देताना पत्रकार परिषद घेत […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
राज्य चालवायची धमक तर केंद्राकडे बोट का दाखवता? विखेंची ठाकरे सरकारवर टीका
अहमदनगर : केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे आपले स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे, असा हा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता?, असा जळजळीत सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारला केला आहे. महाविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही काय केंद्राला विचारलं होतं का?, असा […]
धक्कादायक! माजी नगरसेविकाच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या, राजकीय वर्तुळात खळबळ
पुणे : माजी नगरसेविका नीता परदेशी राजपूत यांच्या पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव जयंत राजपूत हे नीता परदेशी राजपूत यांचे पती आहेत. नीता परदेशी राजपूत पुणे महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदी होत्या. तसंच काँग्रेस पक्षाच्या नेत्या म्हणूनही काम केलं आहे.या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
ब्रेकींग : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कोरोना लसीबाबत मोठं आश्वासन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जेव्हा करोनाची लस भारतात येईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल. कोणालाही यापासून वंचित ठेवलं जाणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. वृत्तवाहिनीला मुलाखत देताने त्यांनी हा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले कि, करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं वेळेवर महत्त्वाची पावलं उचलली. त्यामुळे […]
मनसे उपशहर अध्यक्षाची तलवारीने वार करून हत्या
मुंबई : मनसे अंबरनाथ उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांच्यावर चार हल्लेखोरांनी तलवारीने वार केल्याची घटना घडली. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जागेच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणात मोठी नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, […]
शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा असे आदेश त्यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याचं सांगितलं जात आहे.असा प्रश्न जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हटले कि, कोणत्याही पक्षाचा प्रमुख हेच […]
कांदा प्रश्नावर राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये – शरद पवार
नाशिक : कांद्याच्या दरात कायम चढ उतार होणं ही चिंतेची बाब असून कांदा आयात निर्यतीचे सर्व अधिकार केंद्राकडे आहे. निर्यात बंद करणं आणि आयात सुरु करणं परस्परविरोधी निर्णय असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. शरद पवार नाशिक दौऱ्यावर असून आज त्यांच्या अध्यक्षतेखाली कांदा प्रश्नावर महत्तपूर्ण बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. शरद पवार म्हटले […]
उभ्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे, बहुसंख्य शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार
अकोले : पंचनामे सुरु झाले खरे पण फक्त उभ्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत असल्याने नुकसान भरपाई अत्यंत थोड्या शेतकऱ्यांना मिळेल व बहुसंख्य शेतकरी भरपाईपासून वंचित राहतील. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परतीच्या पावसाने भिजून खराब झालेल्या पिकाचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी उभ्या पिकांची तातडीने काढणी मळणी केली. पावसाने भिजलेला, काळवंडलेला हा निकृष्ट शेतमाल […]
रेडी रेकनरच्या दरात मोठा घोटाळा, राज्याचा कोट्यवधींचा महसूल बुडवला
मुंबई : महसूल विभागाने मुंबईतील महसूल विभागाच्या जमिनीचे रेडीरेकनरचे दर काही बिल्डरांसाठी ५० टक्यांपेक्षा कमी करून राज्याचा कोट्यवधींचा महसूल बुडवला आहे. यात सुमारे १० हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला असून, याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून केली आहे. मुंबईतील जमिनीचे रेडीरेकनरचे दर हे दरवर्षी १.७४ […]
पंकजा मुंडे, महादेव जानकर, रमेश कराड यांच्यावर ‘या’ कारणामुळे गुन्हा दाखल
बीड : पंकजा मुंडे यांनी भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा घेतल्याने त्यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. सावरगाव घाट येथे २५ ऑक्टोंबर रोजी विजयादशमीच्या मुहुर्तावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला होता. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा ऑनलाईन […]










