पुणे : माजी नगरसेविका नीता परदेशी राजपूत यांच्या पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव जयंत राजपूत हे नीता परदेशी राजपूत यांचे पती आहेत. नीता परदेशी राजपूत पुणे महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदी होत्या. तसंच काँग्रेस पक्षाच्या नेत्या म्हणूनही काम केलं आहे.या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत राजपूत हे व्यावसायिक असून त्यांचे लॉ कॉलेज रोड येथे ऑफिस आहे. तिथेच जयंत रजपूत यांनी रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा कार्यालयात गेल्यावर ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचं कारण अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही. डेक्कन पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.