बिहारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे. भाजपच्या रेणू देवी यांच्यासह तारकिशोर प्रसाद यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तारकिशोर प्रसाद भाजप विधानसभेचे नेते म्हणून कटिहार मधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर रेणू देवी चौथ्यांदा बेतियाह मधून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. सुशील कुमार मोदी यांनी तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांचे अभिनंदन केले. […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
काँग्रेस नेतृत्वाला बिहारचा पराभव सामान्य बाब वाटत असावी, कपिल सिब्बल यांचा पक्षाला घरचा आहेर
काँग्रेस नेतृत्वाला बिहारचा पराभव सामान्य वाटत असावा असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे की बिहारच नाही तर देशात ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या तेथील जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. लोकांना आमच्याकडून अपेक्षा उरलेल्या नाहीत. “गुजरातच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. तीन ठिकाणी उमेदवारांचे […]
नितीश कुमार यांचं मोठं वक्तव्य…. हे असणार बिहारचे मुख्यमंत्री..
बिहार : मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी तयारीही सुरु झाली आहे. सोमवारी नितीश कुमार यांचा शपथविधी पार पडणार असून त्याआधी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी सरकार स्थापनेसाठी नितीश कुमार यांना निमंत्रण दिलं आहे. नितीश कुमार राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात पोहोचले होते. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी […]
काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल अतिदक्षता विभागात (ICU); प्रकृती चिंताजनक
नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांची प्रकृती खालावली आहे. अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. कोव्हिड संसर्गानंतर पटेल यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु आहेत अहमद पटेल यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आपल्याला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती पटेल यांनी एक ऑक्टोबरला ट्विटरवरुन दिली होती. तेव्हापासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार […]
बिहारमध्ये मंत्रिमंडळ बरखास्त; सरकार स्थापन करण्यासाठी नितीशकुमार यांची लगबग…
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांना भेटून त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे. त्यांनी विद्यमान मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. त्यामुळे नवं सरकार स्थापन होईपर्यंत नितीशकुमार हे बिहारचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर आता एनडीएने सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप, जनता […]
महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचं पीक येणार नाही; पण बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता : संजय राऊत
मुंबई: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे जेव्हा अस्वस्थ असतात तेव्हा पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. शिवाय दगाफटका करण्यात ते माहिर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये केव्हाही राजकीय भूकंप होऊ शकतो, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यात ऑपरेशन लोटसचं पीक येणार नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संजय राऊत म्हणले कि, […]
शिवसेनेला ‘शवसेना’ म्हणत शिवसेनेवर बोचरी टीका..
मुंबई : बिहार निवडणुकीमध्ये मात्र शिवसेनेने लढविलेल्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेला ‘शवसेना’ म्हटले आहे. तसंच शिवसेनेने बिहारमध्ये आपल्या साथीदारांना ठार मारल्याचा टोला हाणला आहे. महाराष्ट्र कुठेही नेऊन ठेवला असेल […]
भाजप माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे
औरंगाबाद : भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे. त्यामुळे माझ्या बापाच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार”, असं विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या शिरीष बोराळकरांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. एका […]
बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन करणार, जनतेचा निर्णय महागठबंधनच्या बाजूने – तेजस्वी यादव
बिहार : नितीश कुमारच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बिहारमध्ये एनडीएचं सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु असताना तेजस्वी यादव यांनी मात्र महागठबंधन सरकार स्थापन होईल, असं सांगत आमदारांना तयार राहण्याचा आदेश दिला आहे. तेजस्वी यादव म्हटले कि , जनतेचा निर्णय महागठबंधनच्या बाजूने होता, पण निवडणूक आयोगाचा निर्णय एनडीएच्या बाजूने होता. […]
भाजपला धक्का : भाजपचे माजी जिल्हाध्यक्षाचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई : भाजपचे ठाण्याचे माजी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चोरगे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तरुण नेते रणजित देशमुख यांनी देखील काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. सातारा आणि ठाण्यातील भाजप नेत्यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर राज्यभरातील आणखी बरेच नेते आपल्या संपर्कात असल्याचं बाळासाहेब थोरात […]










