BJP Is My Father’s Party, Its My Love Says Pankaja Munde

भाजप माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे

औरंगाबाद महाराष्ट्र राजकारण

औरंगाबाद : भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे. त्यामुळे माझ्या बापाच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार”, असं विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या शिरीष बोराळकरांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. एका व्यक्तीचं तिकीट कापून मी शिरीष बोराळकर यांच्या कार्यक्रमाला आले, त्यामुळे जो काही मेसेज द्यायचा तो मी दिला आहे. सर्व वर्गांना समान न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. माझ्यावर पक्षाचे आणि बापाचे संस्कार आहेत. त्यामुळे मी पूर्ण काम करेन, असं पंकजा मुंडें म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जिल्ह्यात आलेले होते. या दौऱ्यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अनुपस्थित असल्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत आपण मराठवाडयातील बैठकांना उपस्थित राहू शकत नाही, असे या आधीच सांगितले होते, असे स्पष्ट केले. “चंद्रकांत पाटील आणि माझी दोन दिवसांपूर्वीच भेट झाली होती. ते माझ्या घरी नाश्ता करण्यासाठी आले होते. आमच्या छान गप्पाही झाल्या. यावेळी आमच्यात सविस्तर चर्चा झाली. यावेळी मराठवाडयातील बैठकांना उपस्थित राहू शकत नाही, याबद्दलही माझे त्यांच्याशी बोलणे झाले. ही संघटनेची आढावा बैठक होती, त्यापूर्वीच्या संध्याकाळी मी कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते.” असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत