मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीच्या कारवाईपासून कोणताही दिलासा मिळाला नाही. अनिल देशमुख यांनी ईडीच्या कारवाईविरोधात आणि ईडी समन्स रद्द करण्याबाबत केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पात्र लिहून त्यात आरोप केला होता की अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदावर असताना दरमहा १०० […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
‘त्या’ प्रकरणाला वेगळे वळण; CBI ने अनिल देशमुख यांच्या जावयाला तर सोडले, पण…
मुंबई: सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना २० मिनिटांच्या चौकशीनंतर जाऊ दिले असून देशमुख यांच्या लीगल टीममधील वकील आनंद डागा यांना ताब्यात घेण्यात आले आहे व त्यांची अजूनही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. डागा यांच्यावर अटकेची कारवाई होण्याचीही शक्यता आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांना क्लीनचिट दिल्याचा प्राथमिक चौकशी अहवाल […]
मोठी बातमी! शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने टाकले छापे
वाशिम : शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने कारवाई केली आहे. वाशिम जिल्ह्यातील एकूण नऊ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकल्याची माहिती मिळत आहे. त्यात भावना गवळींच्या पाचही शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी सुरु असून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. यवतमाळ-वाशिमच्या खासदार असलेल्या गवळींच्या ५ संस्थांवर ईडीने छापे टाकले आहेत. भाजपा […]
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज अलिबाग पोलिसांसमोर हजेरी लावण्याचे आदेश
रायगड : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर महाड सत्र न्यायालयाने राणेंना सशर्त जामीन मंजूर केला. असे असले तरीही न्यायालयाने राणे यांना महिन्यातून दोन वेळा पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. राणे यांना आज (३० ऑगस्ट) अलिबाग पोलिस स्थानकात हजेरी लावण्याचा आदेश देण्यात […]
अनिल परब यांना ईडीची नोटीस, भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत असल्याची संजय राऊत यांची प्रतिक्रिया
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यांना 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात समन्स बजावल्याची माहिती मिळाली आहे. ईडीने अनिल परब यांना मंगळवारी (३१ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता ईडीच्या मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. संजय राऊत यांनी याबाबत ट्वीट करत म्हटले कि केंद्र सरकारने सूडबुद्धीने […]
नारायण राणे यांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण, पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली आपली भूमिका
मुंबई : ‘तुम्ही कोणीही माझं काही करू शकत नाही, तुम्हाला सर्वांना मी पुरून उरलो तुमच्या कोणत्याही प्रतिक्रियेला मी घाबरत नाही. शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. तेव्हा आताचे कुणीही नव्हते. त्यांना आमचा बंदोबस्त करायचा करू द्या, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपली […]
मोठी बातमी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर सशर्त जामीन मंजूर
रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महाड सत्र न्यायालयात रात्री पावणे दहा वाजता दाखल करण्यात आले. त्यानंतर कोर्टात राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणीला सुरुवात झाली. कोर्टपरिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून या परिसराला छावणीचं रुप आलं होत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह भाजपचे कार्यकर्तेही इथे दाखल झाले होते. पोलिसांकडून ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. […]
मोठी बातमी! नारायण राणे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं. त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांना […]
रत्नागिरी न्यायालयाने फेटाळला नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज
रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता नारायण राणें यांना अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. Narayan Rane’s anticipatory bail rejected by Ratnagiri court #NarayanRane — Prithviraj Maske (@PrithvirajM25) […]
लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना पॉझिटिव्ह; अमोल कोल्हेंचे रुग्णालयातून हात जोडून आवाहन…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ते सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोल्हे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते मात्र, तरिही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यानंतर कोल्हे यांनी रुग्णालयातून सर्व नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. खासदार अमोल कोल्हे व्हिडीओच्या माध्यमातून […]









