ed raids shiv sena mp bhavana gawli educational institutions

मोठी बातमी! शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने टाकले छापे

महाराष्ट्र राजकारण

वाशिम : शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने कारवाई केली आहे. वाशिम जिल्ह्यातील एकूण नऊ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकल्याची माहिती मिळत आहे. त्यात भावना गवळींच्या पाचही शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी सुरु असून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यवतमाळ-वाशिमच्या खासदार असलेल्या गवळींच्या ५ संस्थांवर ईडीने छापे टाकले आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता की भावना गवळी यांनी आपल्या खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला आहे. आपल्याकडे सबळ पुरावे असून ईडी, सीबीआय, सहकार मंत्री, आयकर विभाग यांसह अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्याची माहिती २० ऑगस्ट रोजी वाशिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेते किरीट सोमय्या यांनी दिली होती.

कोण आहेत भावना गवळी?

भावना गवळी विदर्भातील शिवसेनेच्या नेत्या आहेत. आतापर्यंत त्या पाच वेळा यवतमाळ वाशिम मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. भावना गवळी यांनी वयाच्या २४ व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला. त्यांनी २००४, २००९, २०१४ आणि २०१९ असा सलग पाचवेळा लोकसभेत विजय मिळवला. माजी खासदार दिवंगत पुंडलिकराव गवळी यांच्या त्या सर्वात लहान मुलगी आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत