bail granted to narayan rane decision by mahad court

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज अलिबाग पोलिसांसमोर हजेरी लावण्याचे आदेश

महाराष्ट्र राजकारण

रायगड : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर महाड सत्र न्यायालयाने राणेंना सशर्त जामीन मंजूर केला. असे असले तरीही न्यायालयाने राणे यांना महिन्यातून दोन वेळा पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. राणे यांना आज (३० ऑगस्ट) अलिबाग पोलिस स्थानकात हजेरी लावण्याचा आदेश देण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राणेंना अटक करण्याचे आदेश काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. नारायण राणेंवर कारवाई केल्यानंतर महाड न्यायालयाने सुनावणीत राणेंना अटीशर्ती ठेवून जामीन मंजूर केला होता. नारायण राणे आज अलिबाग पोलिसांसमोर हजेरी लावणार असल्याची माहिती मिळाली आहे. नारायण राणे अलिबागला येणार असल्यामुळे या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील बघायला मिळत आहे.

काय आहे प्रकरण?
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली होती. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले होते. ही कारवाई केल्यानंतर महाड न्यायालयाने राणेंना सशर्त जामीन मंजूर केला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत