पंजाब : काँग्रेस पक्षाने नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हाँलद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये सांगण्यात आलं की माननीय काँग्रेस अध्यक्षांनी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश निवडणूक समितीच्या स्थापनेच्या प्रस्तावाला खालीलप्रमाणे तत्काळ मंजुरी दिली आहे. Hon’ble Congress President has approved the proposal of the […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
बेशिस्त वर्तन केल्यामुळे ‘हे’ १२ खासदार राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनातून निलंबित
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ‘बेशिस्त वर्तन’ केल्यामुळे विरोधी पक्षाच्या बारा खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. एकूण १२ खासदारांना त्यांच्या अनियंत्रित वर्तनासाठी राज्यसभेच्या संपूर्ण अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे की, “हे सभागृह गंभीरपणे दखल घेते आणि अध्यक्षांच्या अधिकाराची पूर्ण अवहेलना करणे, सभागृहाच्या नियमांचा सतत गैरवापर करणे, अभूतपूर्व गैरवर्तन आणि […]
लातूर महानगरपालिकेकडून दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्गाचे लोकार्पण
लातूर : लातूर महानगपालिकेने परमपूज्यनिय दादा बळीराम शिवराम गायकवाड यांच्या नावाने त्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या सरस्वती विद्यालयाच्या समोरील रस्त्याचे आज त्यांच्या ९१ व्या जयंती च्या निमित्त “दादा बळीराम शिवराम गायकवाड मार्ग” असे नामकरण करून त्यांचा गौरव केला आहे. नामकरण फलकाचे उद्घाटन लातूर महानरपालिकेचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. दादा बळीराम शिवराम गायकवाड […]
माजी खासदार डॉ सुनील गायकवाड यांची दिल्लीच्या डॉ आंबेडकर परिनिर्वाण भूमि सम्मान- समिती च्या कार्यकारिणी वर नियुक्ती
मुंबई : लातूर लोकसभेचे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांची दिल्ली च्या डॉ आंबेडकर परिनिर्वाण भूमि सम्मान- कार्यक्रम समिती च्या कार्यकारिणी वर नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ आंबेडकर परिनिर्वाण भूमि सम्मान- कार्यक्रम समिती ( रजि.)दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष इंद्रेश गजभिये यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणभूमी ( निधन स्थळ) २६ […]
माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना “राष्ट्रीय कोरोना सेनानी सन्मान” पुरस्कार
लातूर : लातूर लोकसभेचे माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना २०२१ चा डॉ विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशन नवी दिल्ली चा “राष्ट्रीय कोरोना सेनानी सन्मान” पुरस्कार मिळाला आहे. कोरोनाच्या काळात अनेक गरजू गरीब लोकांची, तसेच मराठी सिनेमा आणि मराठी मालिकांमधील अनेक कलाकारांची कोरोनाच्या काळात दयनीय परिस्थिती झाली होती. त्यावेळी अनेकांना आर्थिक आणि अन्न धान्याची […]
मा.खा.डॉ सुनील गायकवाड यांना अमेरिकन युनिव्हर्सिटी कडून पी. एच. डी. प्रदान.
मुंबई (प्रतिनिधी) : लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना मुंबई येथे “द अमेरिकन यूनिवर्सिटी USA “ कडून डॉक्टर ऑफ फ़िलॉसाफ़ी (मेडिकल & पोलिटिकल साइयन्स) या विषयात Ph.D.( ऑनर्स) देऊन गौरव करन्यात आला. द अमेरिकन यूनिवर्सिटी-USA चे फ़ाउंडर अण्ड चेअरमन प्रोफ़ेसर डॉ मधु कृष्णन आणि मुंबई चे ख़ासदार डॉ गोपाल शेट्टी यांच्या हस्ते […]
लखीमपूर खेरी हिंसा : अखेर आशिष मिश्रा याला समन्स जारी, SC च्या कठोर भूमिकेनंतर पोलिस सक्रिय
लखीमपूर : केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, आशिष पांडे आणि लव कुश यांना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांची चौकशी केली जात आहे. या घटनेत आशिष पांडे आणि लव कुश यांचाही सहभाग होता आणि दोघेही जखमी झाले होते. आयजी रेंजकडून दोघांची चौकशी सुरु […]
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा राजीनामा, पक्षात अपमानजनक वागणूक मिळाल्याची खंत केली व्यक्त
चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काही वेळापूर्वी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी राजीनामा देण्याचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की मला पक्षात अपमानजनक वागणूक देण्यात येत होती. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सांगितले कि, “मला अपमानजनक वागणूक देण्यात आली. आज […]
शरद पवार म्हणाले, काँग्रेसची अवस्था रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी, पण…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की ‘आजच्या काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील जमीनदारासारखी झाली आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळे हिरवेगार शिवार माझे होते, असे सांगतो. तशीच काहीशी काँग्रेसची स्थिती आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (MVA) सरकारचे […]
खळबळ! आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेत्याची टॉवेलने गळा दाबून हत्या
उत्तर प्रदेश : बागपतचे भाजप नेते आणि माजी मंत्री आत्माराम तोमर यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. टॉवेलने तोमर यांचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी एका भाजप नेत्याची हत्या करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बडौतच्या बिजरौल रोडवर […]










