Punjab Chief Minister Amarinder Singh resigns

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा राजीनामा, पक्षात अपमानजनक वागणूक मिळाल्याची खंत केली व्यक्त

देश राजकारण

चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काही वेळापूर्वी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी राजीनामा देण्याचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की मला पक्षात अपमानजनक वागणूक देण्यात येत होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सांगितले कि, “मला अपमानजनक वागणूक देण्यात आली. आज सकाळीच माझा निर्णय झाला होता. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना माझा हा निर्णय कळवला होता. माझ्या नेतृत्वावर शंका उपस्थित करण्यात आली. दोन महिन्यांत तीन वेळा संवाद न साधता नेतृत्वाकडून थेट विधिमंडळ दलाची बैठक बोलावण्यात आली. आता मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांच्यावर सोपवावी.”

मी अजूनही काँग्रेस पक्षात आहे. साडे नऊ वर्ष मी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. समर्थकांशी चर्चा केल्यानंतरच पुढचा निर्णय घेईल. माझ्यासमोर अनेक मार्ग खुले आहेत’, असंही अमरिंदर सिंह म्हणाले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत