Actor Sonu Sood infected with corona

सोनू सूद अडचणीत! आयकर विभागाला आढळली सुमारे 250 कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता

मनोरंजन

नवी दिल्ली : आयकर विभागाकडून सोनू सूदच्या घरी आणि कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली. त्यानंतर आता आयकर विभागाला सोनू सूदच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सुमारे 250 कोटी रुपयांची अनियमितता आढळून आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सोनू सूदवर अडीचशे कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप आहे. यामध्ये त्याला चॅरिटीमध्ये मिळालेले फंड आणि बोगस करारांचा देखील समावेश आहे. विशेष गोष्ट म्हणजे सोनू सूदने संपूर्ण भारतभर देणग्या दिल्या आहेत. कर विभागाने सोनू सूदशी संबंधित एकूण 28 ठिकाणी छापे मारून तपास केला आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, लखनौ, जयपूर, कानपूर आणि गुरुग्राम यांचा समावेश आहे. सोनू सूदविरोधात करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा तपास आहे.

सोनू सूदने क्राउड फंडिंगद्वारे 20 कोटी रुपयांचा निधी जमा केल्याचा आयकर विभागाचा दावा आहे. याशिवाय, त्याने बनावट करारांद्वारे 65 कोटी रुपये उभे केले आहेत आणि 175 कोटी रुपयांचे परिपत्रक आणि संशयास्पद व्यवहार केले आहेत. सोनू सूदकडून रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच अशी अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, ज्यावरून करचोरी केल्याचे दिसत आहे. आयकर विभागाचा तपास अजूनही सुरूच आहे.

सोनू सूद एक चित्रपट अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून त्याच्या भूमिका प्रेक्षकांना चांगल्याच आवडल्या आहेत. त्याने लॉकडाऊनमध्ये लोकांना मदत केल्याबद्दल बरीच प्रशंसा मिळवली आहे. सोनू सूदवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे त्याचे चाहते खूप नाराज झाले आहेत आणि सोशल मीडियावर सतत कमेंट करून आपले मत व्यक्त करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत