Body Of Local Bjp Leader Atmaram Tomar Found In Baghpat

खळबळ! आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेत्याची टॉवेलने गळा दाबून हत्या

देश राजकारण

उत्तर प्रदेश : बागपतचे भाजप नेते आणि माजी मंत्री आत्माराम तोमर यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. टॉवेलने तोमर यांचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी एका भाजप नेत्याची हत्या करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, बडौतच्या बिजरौल रोडवर असलेल्या आत्माराम तोमर यांच्या निवासस्थानी ही घटना घडली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पुढे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. टॉवेलने तोमर यांचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

शुक्रवारी सकाळी तोमर यांच्या गाडीचा ड्रायव्हर त्यांच्या निवासस्थानी आला, तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. बराच वेळ होऊनही कुणीही दरवाजा उघडला नाही, त्यामुळे संशय आल्यानं ड्रायव्हरने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. खोलीत जाऊन पहिले तेव्हा त्याला आत्माराम तोमर यांचा मृतदेह बेडवर पडलेला दिसला. त्यांच्या चेहऱ्यावर टॉवेल पडलेला होता. हे दृश्य पाहून ड्रायव्हरने त्वरीत त्यांच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत