मुंबई : निवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. माधव गोडबोले यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ्या पदांवर काम केले. प्रशासकीय सेवेतील निवृत्तीनंतरही ते कायम सक्रीय होते. विविध वृत्तपत्रांतील स्तंभलेखनाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रशासकीय अनुभव जनसामान्यांसमोर मांडले. तसंच प्रशासकीय सेवेत दाखल […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
आज ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी उष्णतेची लाट
पुणे : राज्यात येत्या पाच दिवसांत तीव्र हवामान सक्रिय राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात आणि कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. याचवेळी मध्य महाराष्ट्रामध्ये सोमवारपासून उष्णतेच्या लाटेचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोकण किनारपट्टी, अरबी समुद्रावर तसेच मुंबई, ठाणे, पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील […]
मोठी बातमी! राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई, २४ एप्रिल : सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुट्टीकालीन न्यायालयानं हा निकाल दिला. या प्रकरणातील पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल. त्याआधी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय राणा दाम्पत्याकडे उपलब्ध आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी […]
मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, अल्पवयीन पीडितेच्या मागणीवरून बलात्काराची केस केली रद्द…
मुंबई : अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पीडितेने बलात्काराची केस बंद करण्याची संमती दिली, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने बलात्काराचा एफआयआर रद्द केला आहे. न्यायमूर्ती पीबी वराळे आणि एसएम मोडक यांच्या खंडपीठाने पीडितेने दाखल केलेल्या ना-हरकतीच्या प्रतिज्ञापत्राची तपासणी केली ज्यात असे म्हटले आहे की फौजदारी कारवाई तिच्या शैक्षणिक कारकिर्दीला अडथळा ठरेल. मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच एका अल्पवयीन […]
राणा दाम्पत्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब आणि शेकडो शिवसैनिकांविरोधात तक्रार
मुंबई : राणा दाम्पत्याविरोधात खार पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. दरम्यान, आक्रमक झालेल्या नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत, परिवहन मंत्री अनिल परब आणि शेकडो शिवसैनिकांच्या विरोधातही तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांनी शिवसैनिकांना चिथावल्याचा आरोप या तक्रारीतून राणांनी केला आहे. राणा दाम्पत्याच्या तक्रारीत नमूद मुद्दे उद्धव […]
वन्यजीवांसोबतच मानवी जीवसुद्धा महत्त्वाचा, वन्यप्राण्यांचे माणसांवरील वाढते हल्ले चिंताजनक…
चंद्रपूर : सिंदेवाही आणि परिसरात गत तीन दिवसात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. जंगलालगत असलेल्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहे, याबाबत चिंता व्यक्त करत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जंगलव्याप्त भागात वनविभागाने गस्त वाढवावी, असे निर्देश दिले. तसेच वन्यजीवांसोबत मानवी जीवसुध्दा महत्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव जाणार नाही, याबाबत ठोस उपाययोजना करावी, अशा […]
नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांकडून अटक
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालिसाच्या पठणावरून सुरू असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. शिवसेना कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक करून पोलिस ठाण्यात नेले आहे. हनुमान चालीसा पठणावरून महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला असून आज तो नाट्यमयरित्या संपुष्टात आला […]
शांततापूर्ण आंदोलन हा मुलभूत अधिकार, न्यायालयाकडून ‘त्या’ पाच महिलांची निर्दोष मुक्तता
मुंबई : पाणीपुरवठ्याच्या कमतरतेच्या निषेधार्थ बेकायदेशीरपणे एकत्र जमल्याचा आरोप असलेल्या पाच महिलांची मुंबईच्या कुर्ला येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अलीकडेच निर्दोष मुक्तता केली. न्यायदंडाधिकारी आर.एस.पाजनकर यांनी लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा मूलभूत अधिकार असल्याचे प्रतिपादन केले. “लोकशाही देशात शांततापूर्ण आंदोलन करणे हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. काही दिवसांपासून आपल्या भागात पाणीपुरवठा होत नसल्याने महिला आंदोलन करत होत्या. […]
पुण्यासह नगरमध्ये पुढील 3 ते 4 तासांत जोरदार पाऊस, वादळी वारे वाहण्याची शक्यता…
पुणे : पुढील 3 ते 4 तासांत पुणे, अहमदनगर जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. पुण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, या ढगाळ वातावरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दिवसाच्या […]
नरेंद्र मोदींमुळे राणा दाम्पत्याने ‘मातोश्री’वर जाण्याची भूमिका बदलली, रवी राणा यांनी दिली माहिती…
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाच्या बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आपली भूमिका बदलली आहे. राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मुंबईत काही ठिकाणी तणावाची स्थितीही निर्माण झाली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी […]









