मुंबई, 23 एप्रिल : राज्य जीएसटी विभागाने मुंबईतील झवेरी बाजार परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवण्यात आलेली 10 कोटींची रोकड, 19 किलो चांदीच्या विटा आढळून आल्या आहेत. मुंबईच्या झवेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष 2020-21 मध्ये 652 कोटी आणि […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
पुणे : मसाज-स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका
पुणे : पुण्यातील विमाननगर या मध्यवर्ती परीसरात मसाज सेंटरच्या नावाखाली परराज्यातील मुलींकडून वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक केली असून तीन आरोपींचा शोध सुरु आहे, तर 3 पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर पोलीस स्टेशन हद्दीतील ‘मेरीयन स्पा” मध्ये मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत […]
दुःखद! हळद शिजवताना कुकरचा स्फोट झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
नांदेड : हळद शिजवताना कुकरचा स्फोट झाल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी देखील झाले. या स्फोटात सुनील मारवाड (वय 28) यांचा जागीच मृत्यू झाला. मुखेड तालुक्यातील दापका गुंडोपंत गावात ही घटना घडली. कच्ची हळद शिजवताना कूकरमधून पाण्याची गळती होऊ लागली. त्यामुळे नक्की काय झाले हे पाहण्यासाठी सुनील […]
मोठी बातमी! नवाब मलिक यांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली याचिका
नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणातील न्यायालयीन कोठडीतून सुटकेची मागणी करणारी महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली, ज्याची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत चौकशी केली जात आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालय या टप्प्यावर हस्तक्षेप करू शकत नाही. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, “तुम्ही योग्य न्यायालयात जामीनासाठी अर्ज […]
डॉ. सुनील गायकवाड यांना लेजंड दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित
मुंबई : लातूर लोकसभेचे माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना कृष्णा चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्याकडून दिला जाणारा अत्यंत सन्मानाचा “लेजंड दादासाहेब फाळके पुरस्कार, २०२२” मिळाला आहे. हा पुरस्कार मुंबई येथे 4 मे रोजी एका शानदार पुरस्कार समारोह कार्यक्रमात त्यांना दिला जाणार आहे. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी सोळाव्या लोकसभेत अनेक महत्त्वपूर्ण कामे केली. […]
राज्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी
मुंबई : राज्यात पुढील 4 ते 5 दिवस दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या […]
ब्रेकिंग! धनंजय मुंडे यांना धमकी देणाऱ्या ‘त्या’ महिलेला मुंबई पोलिसांनी केली अटक
मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 ने एका महिलेला अटक केली आहे. या महिलेने धनंजय मुंडे यांना धमकावत 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. जर पैसे दिले नाहीत तर बलात्काराची तक्रार दाखल करेन. तसेच 5 कोटी आणि महागडा मोबाइल दिला नाही तर […]
खोटी बिले दाखवून कर चुकविल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक, करोडो रुपयांच्या कर महसुलाची हानी…
मुंबई : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी केल्याप्रकरणी, करचुकवेगिरीसाठी मे. ओम साई इंटरप्राईसेसचे मालक अनिल जाधव यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने 19 एप्रिल रोजी अटक केली आहे. खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध राज्य शासनाच्या वस्तु व सेवाकर विभागाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. ओम साई इंटरप्राईसेस […]
शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी जिल्हा वार्षिक योजनेत ५ टक्के निधी राखीव
मुंबई : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या योजनांची पुनर्रचना करुन त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये (सर्वसाधारण) किमान 5 टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या बैठकीत शालेय शिक्षण व क्रीडा (क्रीडा उपविभाग वगळून ) विभागाच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधील सध्या अस्तित्वात असलेल्या शालेय शिक्षणाशी संबंधित चार […]
सिलबंद विदेशी मद्याच्या विक्री परवान्यांसाठी नवीन दोन श्रेणी, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
राज्यात सिलबंद विदेशी मद्याच्या किरकोळ विक्रीच्या परवान्यासाठी क्षेत्रफळ तसेच सुविधांच्या आधारे नवीन दोन श्रेणी तयार करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या एफ.एल.-2 परवान्यांचे क्षेत्रफळ तसेच सुविधांच्या आधारे नवीन दोन श्रेणी तयार करुन विद्यमान परवानाधारकांना त्यांच्याकडील परवान्याची श्रेणीवाढ करण्यास मुभा देण्यात येणार आहे. यात अतिउच्च दर्जाची […]









