Post Office Recurring Deposit Scheme Invest 100 Daily For 10 Years And Get 5 Lakh On MaturityPost Office Recurring Deposit Scheme Invest 100 Daily For 10 Years And Get 5 Lakh On Maturity
महाराष्ट्र मुंबई

खोटी बिले दाखवून कर चुकविल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक, करोडो रुपयांच्या कर महसुलाची हानी…

मुंबई : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी केल्याप्रकरणी, करचुकवेगिरीसाठी मे. ओम साई इंटरप्राईसेसचे मालक अनिल जाधव यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने 19 एप्रिल रोजी अटक केली आहे. खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध राज्य शासनाच्या वस्तु व सेवाकर विभागाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. ओम साई इंटरप्राईसेस या प्रकरणात अन्वेषण करण्यात आलेले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मे. ओम साई इंटरप्राईसेसचे मालक अनिल जाधव हे प्रत्यक्षात कोणत्याही वस्तु व सेवा यांचा प्रत्यक्ष पुरवठा करीत नाहीत. तर फक्त खोटी बिजके देत असल्याचे या प्रकरणातील तपासणीदरम्यान आढळले आहे. या व्यक्तीच्या विवरण आणि बँक खात्यांमधून 58 कोटींची बनावट तसेच बेहिशेबी उलाढाल दाखवून आणि 10.45 वस्तू व सेवा कर त्यांच्या प्राप्तकर्त्यांना स्थानांतरित करुन 10.45 कोटी रुपयांच्या कर महसुलाची हानी केली असल्याचे या प्रकरणातील तपासणीदरम्यान आढळून आले आहे.

अन्वेषणादरम्यान जाधव हे महसूल हानीमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अनिल जाधव याला महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरीसाठी अटक केली आहे. या व्यक्तीचे कृत्य हे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून वस्तू व सेवा कर कायदा 2017 नुसार तुरुंगवासास पात्र आहे. त्याला मुख्य न्यायाधीश, ठाणे यांनी 2 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात अन्वेषण अधिकारी प्रेमजीत रणनवरे (सहाय्यक राज्यकर आयुक्त) हे देवेंद्र शिंदे (राज्यकर उपायुक्त) यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. या कार्यवाहीसाठी महेंद्र काटकर (सहायक राज्यकर आयुक्त) आणि तात्यासाहेब ढेरे (सहायक राज्यकर आयुक्त) यांचा सक्रिय सहभाग आहे. या कार्यवाहीसाठी राजेंद्र मसराम (राज्यकर सह-आयुक्त) तसेच गोविंद बिलोलीकर (अतिरिक्त राज्यकर आयुक्त) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

अशी फसवेगिरीची प्रकरणे शोधून त्यावर कार्यवाहीसाठी सर्वसमावेशक पृथ:करण साधनाच्या वापरावर विशेष भर देण्यात येत आहे. अशा प्रकारच्या अटक कार्यवाहीद्वारे विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यक्तींना कडक इशारा दिलेला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत