मुंबई : राज्यात पुढील 4 ते 5 दिवस दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अशावेळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे पडण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
21/04: Severe weather warnings issued by @RMC_Mumbai for coming 5 days.
Further details being updated. pic.twitter.com/fnPiy4J9iN— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 21, 2022




