Police raid bust of sex racket

पुणे : मसाज-स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका

क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : पुण्यातील विमाननगर या मध्यवर्ती परीसरात मसाज सेंटरच्या नावाखाली परराज्यातील मुलींकडून वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक केली असून तीन आरोपींचा शोध सुरु आहे, तर 3 पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर पोलीस स्टेशन हद्दीतील ‘मेरीयन स्पा” मध्ये मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत होता. पोलिसांनी 20 एप्रिलला याविषयी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर सदर ठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठवून सापळा रचून छापा टाकण्यात आला. यावेळी येथे मसाजच्या नावाखाली जास्त रक्कम चार्ज करून वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावरून या ठिकाणी पंचनामा करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

स्पा सेंटरचा मॅनेजर सुफीयान अहमद अली (वय २२, रा. सध्या मेरियम स्पा, विमाननगर, पुणे), तसेच त्याचा साथीदार मॅनेजर अब्दुल मलिक मुफुर अली (वय 21, रा. सध्या मेरियम स्पा, विमाननगर, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच सदर स्पाचे मालक/भागीदार अन्य व्यवस्थापक अब्दुल हचिब, (रा.आसाम) व अन्वर दाउदभाई अहमदाबादी, तसेच एक महिला यांचा शोध सुरु आहे. या कारवाईदरम्यान एकूण 3 पिडीत महिलांची सुटका करण्यात आली असुन त्यापैकी 1 पिडीत महिला मणीपुर या राज्यातील आहे.

या गुन्ह्रात रोख रकमेसह एकूण 23 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये अनैतिक मानवी वाहतुक -व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, भा. दं. वि. कलम 370, 34 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विमाननगर परिसरातीस एखाद्या व्यक्तीने जस्ट डायल या फोन सुविधेमध्ये मसाज पार्लर बाबत कोणत्याही प्रकारची माहितीविचारल्यास त्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर मेरीयन मसाज पार्लरचे मेसेज येणे सुरु व्हायचे व त्यातून सदर व्यक्तीला गिऱ्हाईक बनवून मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय केला जात होता.

ही कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त, पुणे शहर डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त,(गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उप निरिक्षक सु्प्रिया पंढरकर, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, आण्णा माने, इरफान पठाण, हणमंत कांबळे, संदिप कोळगे व महिला पोलीस अंमलदार राजश्री मोहिते, मनिषा पुकाळे, अश्विनी केकाण यांनी केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत