Tiger Kills 68 Year Old Man In Tadoba
महाराष्ट्र

वन्यजीवांसोबतच मानवी जीवसुद्धा महत्त्वाचा, वन्यप्राण्यांचे माणसांवरील वाढते हल्ले चिंताजनक…

चंद्रपूर : सिंदेवाही आणि परिसरात गत तीन दिवसात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. जंगलालगत असलेल्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहे, याबाबत चिंता व्यक्त करत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जंगलव्याप्त भागात वनविभागाने गस्त वाढवावी, असे निर्देश दिले. तसेच वन्यजीवांसोबत मानवी जीवसुध्दा महत्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव जाणार नाही, याबाबत ठोस उपाययोजना करावी, अशा सूचना त्यांनी वनविभागाला दिल्या.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मानव – वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभुमीवर सिंदेवाही येथील विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, गत तीन – चार दिवसांपासून वारंवार वन्यप्राण्यांकडून नागरिकांवर हल्ले होत आहे. नित्यात्याच झालेल्या या घटना रोखणे खुप आवश्यक आहे. अशा घटना घडल्या की नागरिकांचा आक्रोश वाढतो. त्यामुळे काही अघटीत होऊ नये, यासाठी वनविभागाने त्वरीत उपाययोजना करावी. जंगलव्याप्त गावांत जास्तीची माणसे देऊन वनविभागाने गस्त वाढवावी. प्रत्येक गावात किमान 10 लोक या गस्तकरीता असली पाहिजेत. वाघ आणि बिबट असलेल्या गावांत सोलर लाईट त्वरीत लावावे. त्यासाठी वनअधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील प्रस्ताव तातडीने पाठवा.

जंगलालगत असलेल्या गावात रात्रीचे भारनियमन होत असल्यामुळे अंधाराचा फायदा घेत वन्यजीवांचे हल्ले वाढल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा गावात कोणत्याही परिस्थतीत रात्रीचे भारनियमन होता कामा नये. तसे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले.

सिंदेवाही आणि परिसरात लगातार वन्यप्राण्यांकडून झालेल्या हल्ल्याची माहिती मुंबईत होताच पालकमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित यंत्रणेला तात्काळ सुचना दिल्या. तसेच नरभक्षक असलेल्या या वाघाचा वनविभागाने बंदोबस्त करावा, असे निर्देशही त्यांनी मुंबई येथून दिले होते. अतिशय संवेदनशील आणि नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या या विषयाबाबत त्यांनी त्वरीत सिंदेवाहीत दाखल होऊन वनविभागाची बैठक घेतली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत