मुंबई महापालिकेचे कर्मचारी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करत आहेत. तोडफोडीचे अनेक फोटो समोर येत आहेत. कंगनाने कारवाईचे फोटो ट्विट करत पाकिस्तान असं म्हटलं आहे. तसंच लोकशाहीचा मृत्यू असा हॅशटॅगही तिने दिला आहे. Pakistan…. #deathofdemocracy pic.twitter.com/4m2TyTcg95 — Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
मुंबई
मुंबई महापालिकेनं कंगनाचं कार्यालय केलं सील, नोटीस लावून तिला दिले ‘हे’ आदेश
अभिनेत्री कंगना राणावतने तिच्या कार्यालयात अनधिकृतपणे बांधकाम केल्याचे सांगत महापालिकेने तिला नोटीस बजावली असून तिचं कार्यालय सील केलं आहे. तसेच येत्या २४ तासांत कार्यालयातील बांधकामासंदर्भात घेण्यात आलेल्या परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्याचे आदेशही कंगनाला देण्यात आले आहेत. त्याबाबत नोटीस देखील कार्यालयाबाहेर लावण्यात आली आहे. कंगनाने ट्वीटवरुन माहिती दिली की, तिच्या मुंबईतील ऑफिसमध्ये बीएमसीची टीम पोहचली आहे. […]
उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी म्हणून विरार रेल्वे स्थानकात आंदोलन
उपनगरीय रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. त्यामुळे खासगी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी बसेसमधून मुंबईला जावे लागते. मात्र या बसेसची संख्या कमी असून कार्यालयात पोहोचण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हजारो प्रवासी विरार रेल्वे स्थानक परिसरात जमा झाले आणि रुळांवर उतरले. उपनगरीय रेल्वे सुरू करा… अशी मागणी करत त्यांनी […]
रियाची कबुली अंमली पदार्थ खरेदी केले; सेवन केले नाही
मुंबई : रियाला रविवारी सकाळी एनसीबीने बोलावले होते. रिया १२ वाजता एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिची सलग सहा तास चौकशी करण्यात आली. अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली पण सेवन केले नसल्याचे सांगितले, या चौकशीनंतर रियाला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. एनसीबीने रियाच्या घरी छापा मारला होता. या छाप्यात अंमली पदार्थ जप्त झाले नव्हते. सुशांतच्या मृत्यूनंतर […]
शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा पाठोपाठ दीपेश सावंत याला अटक; रियाची होणार चौकशी
मुंबई : अंमली पदार्थ प्रकरणी शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा पाठोपाठ दीपेश सावंत याला अटक, दीपेश हा अंमली पदार्थ प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईतील सातवी अटक असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले. सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती या दोघांविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत कलम ८ क, २० ब, २७ अ, २८ आणि २९ आधारे आरोप ठेवले. यात दोषी आढळल्यास दहा […]
एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला केली अटक
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी ड्रग्ज कनेक्शनसंबंधी एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला अटक केली आहे. सॅम्यूअल मिरांडा यालादेखील एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. एनसीबीने आज गांजा व्यापारी जैसेन, सुशांतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविक याला चोकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर अनेक तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने शोविकला […]
कंगना, जी मुंबई तू पाहतेस ती फक्त मुंबई पोलिसांमुळे सुरक्षित आहे- रुपाली चाकणकर
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या एका ट्विट वरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटर अकाऊंट वरून कंगनावर चांगलीच टीका केली आहे. रुपाली चाकणकर यांचे ट्विट: मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण संस्कारहीन, कृतघ्न लोकांसाठी आम्ही वेळ वाया घालवत नाही. कंगणा राणावत तू उतरलेल्या विमानतळापासून ते […]
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केली कंगनाच्या वक्तव्यावर जोरदार टीका
अभिनेत्री कंगना राणावत ने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारणी आणि सर्वसामान्य तिच्यावर टीका करत आहेत. आता राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील ट्विट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई विषयी वायफळ बडबड करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं कि, मुंबई व महाराष्ट्राच्या विरुद्ध स्टंटबाजीसाठी काहीही बोललेलं महाराष्ट्रातील माणूस खपवून घेणार […]
नाशिक पोलिस आयुक्तपदाचा पदभार सोडताना विश्वास नांगरे पाटील झाले भावुक
राज्य सरकारने पोलिस दलात फेरबदल करत 40 हून अधिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. नाशिक पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. नाशिकचे नवनियुक्त पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नांगरे पाटलांकडून पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील नाशिक येथून पदमुक्त होऊन […]
कंगनाला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही- गृहमंत्री अनिल देशमुख
अभिनेत्री कंगना राणावत ने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारणी आणि सर्वसामान्य तिच्यावर टीकेचे आसूड ओढत आहेत. आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले कि, कंगनाला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कठोर भूमिका घेतली. ते म्हणाले की, “कंगनाने मुंबई […]










