aaditya-paudwal
मनोरंजन मुंबई

गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचं निधन

दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल आणि प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचं आज निधन झालं. आदित्य ३५ वर्षांचा होता. मूत्रपिंड निकामी झाल्यानं त्याचं निधन झाल्याचं कळतंय.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आदित्यची म्युझिक अरेंजर, निर्माता अशी संगीतविश्वात ओळख होती. गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे आदित्यला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र शनिवारी पहाटे आदित्यने अखेरचा श्वास घेतला. मुंबईत आदित्यच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत