मुंबई : महाराष्ट्रात हॉटेल व्यवसायावर आजही निर्बंध कायम आहेत. महाराष्ट्र सरकारने एक जूनपासून राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडायला अनुमती दिली. पण ही परवानगी फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरीपुरता मर्यादीत आहे. हॉटेलमध्ये बसून खाण्यापिण्यावर अद्यापी बंदी कायम आहे त्यामुळे लॉकडाउनचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. सरकारने राज्य परिवहन सेवा, मुंबईत बेस्ट आणि पुण्यात पीएमपीएमएलला पूर्ण क्षमतेने […]
मुंबई
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग
मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, “नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे कोरोना चाचणी करुन घ्यावी. सुरक्षित राहा. […]
भिवंडीत पटेल कंपाउंड परिसरात तीन मजली इमारत कोसळली, ८ ठार
भिवंडी: भिवंडीमध्ये पटेल कंपाउंड परिसरात मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. ही इमारत जिलानी अपार्टमेंट या नावाने ओळखली जात होती. जिलानी अपार्टमेंट १९८४ मध्ये बांधण्यात आली होती. इमारतीत तीन मजले आणि २१ फ्लॅट (२१ घरे) आहेत. इमारत रात्री कोसळली, त्यावेळी सर्व घरात रहिवासी झोपलेले होते. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी […]
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याला विरोध; ते पैसे कोविडसाठी खर्च करावे
मुंबई : डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. परंतु वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपला या पुतळ्याला विरोध असून ते पैसे कोविडसाठी खर्च करावे, असं म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले मी यापूर्वीपासून सांगतोय की पुतळ्याला माझा विरोध आहे. पुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं. […]
डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलला
इंदू मिलवरील जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. “इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष किंवा संघटना असा भेदभाव असूच शकत नाही,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. “एमएमआरडीएने राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण […]
मुंबईकरांवर पुन्हा एकदा निर्बंध येणार; आज मध्यरात्रीपासून जमावंबदी लागू
मुंबई : आता पुन्हा एकदा मुंबईकरांवर निर्बंध येणार आहेत. मुंबईत आज मध्यरात्रीपासून जमावंबदी लागू करण्यात येणार आहे. ही जमावबंदी ३० सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे. याविषयी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. मात्र असं असलं तरीही कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन यावेळी करण्यात आलेला नाही. मात्र, यावेळी नागरिकांना कुठेही गर्दी करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या […]
मराठा समाज आक्रमक; मुंबई, पुण्याचा दूध पुरवठा रोखणार
कोल्हापुर : आरक्षणासह नोकरभरती थांबवण्याच्या मागणीला राज्य सरकारने अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आजपासून कोल्हापुरातून मुंबई, पुणे या शहरांना होणार दूध पुरवठा रोखण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून या आंदोलनाची सुरुवात, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील गोकुळ दूध संघाच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन केले जाईल. मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाचे […]
सुशांत आणि दिशा मृत्यूप्रकरणाबाबत आमदार नितेश राणे यांचं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र
आमदार नितेश राणे यांनी सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाचा संबंध जोडत गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. दिशा ज्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती, तो तिच्या मृत्यूच्या वेळी तिथे उपस्थित होता आणि काही वेळानंतर निघून गेला, पण त्याची अजून साधी चौकशीही करण्यात आलेली नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं […]
म्हाडातर्फे मुंबई आणि ठाण्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी भेट
मुंबईसारख्या शहरात आपले घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकारण्यासाठी हे सरकार प्रयत्न करणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. म्हाडातर्फे मुंबई आणि ठाण्यात स्वस्त दरातील घरे उभारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी म्हाडा मुंबईतील रिकाम्या जागा खरेदी करणार असून तिथे स्वस्त दरातील घरे बांधणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. […]
कंगना रणौतने घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट
अभिनेत्री कंगना रणौतने आज राजभवनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. कंगना आणि शिवसेना असा वाद पेटला असतानाच बृह्नमुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली होती. त्यावर राज्यपालांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कंगनानं आज राज्यपालांची भेट घेतली. यावेळी कंगनाची बहीणदेखील उपस्थित होती. राज्यपालांच्या भेटीनंतर बोलताना कंगना म्हणाली, “राज्यपालांना मी एक नागरिक म्हणून भेटले. ते […]










