MLA Nitesh Rane's letter to Home Minister Amit Shah regarding Sushant and Disha deaths
महाराष्ट्र मुंबई राजकारण

सुशांत आणि दिशा मृत्यूप्रकरणाबाबत आमदार नितेश राणे यांचं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र

आमदार नितेश राणे यांनी सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाचा संबंध जोडत गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. दिशा ज्या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती, तो तिच्या मृत्यूच्या वेळी तिथे उपस्थित होता आणि काही वेळानंतर निघून गेला, पण त्याची अजून साधी चौकशीही करण्यात आलेली नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दिशा सालियनचा मृत्यू हे अजून गूढ आहे. ती रोहन रायसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती आणि त्याची साधी चौकशीही केलेली नाही. दिशाचा मृत्यू झाला तेव्हा रोहन इमारतीत उपस्थित होता आणि ती खाली पडलेल्या ठिकाणी तो २० ते २५ मिनिटांनी गेल्याचंही बोललं जातं. त्यामुळे शंका निर्माण होते, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

चौकशी टाळण्यासाठी रोहनने स्वतःच मुंबई सोडली असावी किंवा त्याला कुणाच्या तरी दबावामुळे मुंबई सोडणं भाग पडलं असावं, असा अंदाज आहे. यामुळे रोहनला सुरक्षा देण्यात यावी, जेणेकरून तो सुरक्षितपणे मुंबईत येऊ शकेल. सीबीआय तपासात रोहनचे वक्तव्य महत्त्वाचे ठरेल. कारण, दिशा आणि सुशांत यांच्या मृत्यू प्रकरणाचा संबंध आहे, असा माझा विश्वास आहे, असंही नितेश राणे यांनी पत्रात म्हटलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत