Maharashtra Assembly Monsoon Session: 12 Bjp Mlas Suspended For One Year

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार राडा, भाजपचे १२ आमदार एक वर्षासाठी निलंबित

महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ सदस्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. सभागृहात गोंधळ घालत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या १२ सदस्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यात आशिष शेलार, गिरीश महाजन, जयकुमार रावल, संजय कुटे या माजी मंत्र्यांचाही समावेश आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाशी संबंधित एक ठराव मांडला. केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळवण्यासंबंधी हा ठराव होता. त्यास भाजपच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. काही सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. तालिका अध्यक्षासमोरचा माइक व राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर सभागृह तहकूब करण्यात आले तरीही हे सदस्य शांत झाले नाहीत. त्यांनी अध्यक्षांच्या दालनातही गोंधळ घालत अध्यक्षांना शिवीगाळ केली. तालिका अध्यक्षांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप सदस्यांच्या या गैरवर्तनाची गंभीर दखल घेत सत्ताधारी पक्षानं निलंबनाचा ठराव आणला.

संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी निलंबनाचा ठराव मांडला. हा ठराव आवाजी मतदान घेऊन मंजूर करण्यात आला. त्यानुसार, भाजपच्या १२ सदस्यांना एक वर्षासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आलं आहे. त्यात संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे आणि कीर्तिकुमार (बंठी) भांगडिया यांचा समावेश आहे. निलंबित सदस्यांना पुढील वर्षभर मुंबई व नागपूर विधिमंडळाच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईचा निषेध केला. ते म्हणाले कि, “भाजपच्या सदस्यांच्या निलंबनाचा ठराव म्हणजे विरोधकांचं संख्याबळ जाणीवपूर्वक कमी करण्याचा डाव आहे. हा लोकशाहीचा खून आहे. काही सदस्यांनी गैरवर्तन केलं असेल तर अध्यक्षांनी त्यांच्याशी चर्चा करायला हवी. थेट निलंबन करणं योग्य नाही.” त्यानंतर भाजपने कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत