pune sanitizer factory fire accident update 20 workers stuck rescue operation underway

ब्रेकिंग : पुण्यात अग्नितांडव, पिरंगुट एमआयडीसी भागातील सॅनिटायझर उत्पादक कारखान्यात भीषण आग, 8 महिला ठार

पुणे महाराष्ट्र

पुणे : पुण्याच्या पिरंगुट एमआयडीसी भागातील एका सॅनिटायझर उत्पादक कारखान्यात सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागली. कारखान्यात अडकलेल्या 37 पैकी 8 महिला कामगार या भीषण आगीत मरण पावल्या आहेत. अद्याप बरेच कर्मचारी बेपत्ता आहेत. कारखान्यातून निघणारे धुराचे लॉट आजूबाजूच्या परिसरात पसरत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदत व बचावकार्य सुरु आहे. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण असते, त्यामुळे आग वेगाने पसरत आहे. जेसीबीच्या साहाय्याने भिंत फोडून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयन्त सुरु आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, ते समजू शकले नाही मात्र, आगीची तीव्रता पाहता आतमध्ये मोठ्या प्रमाणात सॅनिटायजर तसेच इतर ज्वलनशील रसायन साठा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुळशी तहसीलदार अभय यांनी सांगितले की, तीन फायर टेंडरने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिस निरीक्षक अशोक धुमाळही घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशामक दलाचे जवान युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत