housing minister Jitendra Awhad
मुंबई

म्हाडातर्फे मुंबई आणि ठाण्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी भेट

मुंबईसारख्या शहरात आपले घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकारण्यासाठी हे सरकार प्रयत्न करणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. म्हाडातर्फे मुंबई आणि ठाण्यात स्वस्त दरातील घरे उभारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी म्हाडा मुंबईतील रिकाम्या जागा खरेदी करणार असून तिथे स्वस्त दरातील घरे बांधणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड दर सोमवारी दुपारी 2 ते 4 या वेळेत कार्यालयात थेट उपलब्ध असतात. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

पूर्व उपनगरातील टागोरनगर आणि कन्नमवार नगर या भागात मोठ्या वसाहती उभारण्यात येणार आहेत. याबद्दल जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. मुंबईतील रिकाम्या जमिनींविषयीचे खटले न्यायप्रलंबित आहेत. अशा जमिनी ताब्यात घेऊन त्यावर ही घरे बांधण्यात येतील असेही आव्हाड यांनी सांगितले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात घरे किंवा फ्लॅट्स बांधून देता येतील.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत