कोरोना आणि लॉकडाउन यामुळे नाट्य कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या कलाकारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी आज राज ठाकरेंसमोर मांडल्या. यावेळी प्रशांत दामले, अभिनेत्री वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, वामन केंद्रे, पंढरीनाथ कांबळे, अजित भुरे, अतुल परचुरे हे सगळे उपस्थित […]
मुंबई
परदेशी विद्यापीठात ऑनलाईन किंवा कॅम्पस शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्तीचा लाभ
जागतिक पातळीवर १ ते ३०० रँकिंगच्या विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीचा लाभ आता ऑनलाईन किंवा कॅम्पस पद्धतीने शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना देखील घेता येणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला, असं […]
…तर फटाका व्यवसाय अडचणीत; ८० टक्के विक्री दिवाळीत
मुंबईः महाराष्ट्रात प्रदूषणाला आळा घालण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. देशात सर्वाधिक फटाक्यांची विक्री मुंबईत होते. दरवर्षी देशात होणाऱ्या एकूण फटाका विक्रीपैकी जवळपास २५ टक्के विक्री मुंबईत होते. महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी घातल्यास ही विक्री होणार नाही आणि फटाक्यांची बाजारपेठ कोलमडेल, अशी भीती व्यक्त होत आहे. फटाक्यांच्या विक्रीपैकी ८० टक्के विक्री ही दिवाळीत होते. दिवाळीत […]
काही लोकांचं म्हणणं आहे ‘ती’ आत्महत्या नाही, सत्य बाहेर येईलच – निलेश राणे
इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीविरोधात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी अन्वय नाईक व त्यांच्या आईनं आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली, हे पटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या […]
पोलिसांनी मारहाण केल्याचा अर्णब यांचा आरोप; पोलिसांचे स्पष्टीकरण, खरं काय?
मुंबईः अर्णब गोस्वामी यांच्यावर आज सकाळी पोलिसांनी राहत्या घरातून अटकेची कारवाई केली आहे. अटक करतेवेळी अर्णब यांनी कारवाईदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. अर्णब यांच्या आरोपावर पोलिसांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. अर्णब गोस्वामी यांचे आरोप : अन्वय नाईक यांनी अर्णब गोस्वामीनं पैसे थकवल्याचा आरोप करत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याच प्रकरणी रायगड पोलिसांनी आज […]
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय?
पुणे : अन्वय नाईक हे इंटिरिअर डिझाईनर होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय यांच्या कंपनीने रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी डिझाईनिंगचे काम केले होते. काम पूर्ण करूनही नाईक यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नव्हते. कामाचे पैसे मिळवण्यासाठी अन्वय यांनी सातत्याने अर्णव […]
तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती तोंडं बंद करणार आहात? – कंगना रानौत
मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई येथील राहत्या घरातून अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आली. अर्णब गोस्वामी यांनी पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान अटकेच्या कारवाईनंतर कंगनाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कंगनाने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. कंगनाने […]
ब्रेकिंग : अर्णब गोस्वामी यांच्या निवासस्थानी पोलिस दाखल; अर्णब गोस्वामी यांना अटक
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या निवासस्थानी पोलिस दाखल झाले आणि त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शारीरिक अत्याचार केल्याचे अर्णब गोस्वामी यांचे म्हणणे आहे. अर्णब गोस्वामी आणि पोलीस यांच्यात भांडण झाल्याचे रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्क्रीनशॉटमध्ये दिसते आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही […]
कंगना रनौतला मोठा झटका; कंगना रनौतसह बहिण रंगोली चंदेलला वांद्रे पोलिसांची नोटीस
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात वांद्रे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी चौकशीसाठी वांद्रे पोलिसांनी कंगना आणि रंगोलीला समन्स बजावले आहेत. कंगनाला 10 नोव्हेंबर रोजी तर, रंगोलीला 11 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर रहायचे आहे. कंगनावर वादग्रस्त वक्तव्ये करुन समाजामध्ये तेढ […]
विद्यार्थ्यांची भावनिक समृध्दी वाढविण्यासाठी आयआयटी मुंबईने सुरु केले स्व-मदत संकेतस्थळ
मुंबई : केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री श्री. संजय धोत्रे यांनी आज सकाळी 11 वाजता आयआयटी मुंबईने आपल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या बंधू- स्वमदत गट संकेतस्थळाचे उद्घाटन, आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी यांच्या उपस्थितीत केले. आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करताना मंत्री महोदय म्हणाले,”चांगली शैक्षणिक संस्था म्हणजे जेथे प्रत्येक विद्यार्थ्याला आपले स्वागत होत आहे आणि […]









