arnav goswami police

पोलिसांनी मारहाण केल्याचा अर्णब यांचा आरोप; पोलिसांचे स्पष्टीकरण, खरं काय?

महाराष्ट्र मुंबई

मुंबईः  अर्णब गोस्वामी यांच्यावर आज सकाळी पोलिसांनी राहत्या घरातून अटकेची कारवाई केली आहे. अटक करतेवेळी अर्णब यांनी कारवाईदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. अर्णब यांच्या आरोपावर पोलिसांनीही स्पष्टीकरण दिलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अर्णब गोस्वामी यांचे आरोप  :
अन्वय नाईक यांनी अर्णब गोस्वामीनं पैसे थकवल्याचा आरोप करत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याच प्रकरणी रायगड पोलिसांनी आज अर्णब यांच्यावर कारवाई केली आहे. कारवाई करत असताने दोन पोलिसांकडून मारहाण झाली शिवाय कुटुंबातील सदस्यांना व मुलालाही मारहाण केली, असा आरोप अर्णब यांनी केला आहे. अर्णब यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती तिथे बांधलेली पट्टी देखील पोलिसांकढून काढण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या हाताला व पाठीत देखील मारलं आहे, अशी माहिती अर्णब गोस्वामी यांचे वकिल गौरव पारकर यांनी दिली आहे. अर्णब यांच्या अटकेबद्दलची माहिती पत्नीला देखील दिली गेली नव्हती, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पोलिसांचे स्पष्टीकरण :
दरम्यान, पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी घरात प्रवेश केल्यापासून सर्व घटनांचे चित्रीकरण केले आहे. अटकेची कारवाई करतेवेळी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत, न्यायालयाने जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अहवाल मागितला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत