fireworks business is in trouble
महाराष्ट्र मुंबई

…तर फटाका व्यवसाय अडचणीत; ८० टक्के विक्री दिवाळीत

मुंबईः महाराष्ट्रात प्रदूषणाला आळा घालण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. देशात सर्वाधिक फटाक्यांची विक्री मुंबईत होते. दरवर्षी देशात होणाऱ्या एकूण फटाका विक्रीपैकी जवळपास २५ टक्के विक्री मुंबईत होते. महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी घातल्यास ही विक्री होणार नाही आणि फटाक्यांची बाजारपेठ कोलमडेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

फटाक्यांच्या विक्रीपैकी ८० टक्के विक्री ही दिवाळीत होते.  दिवाळीत एका मागून एक राज्यांनी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातल्यास फटाका व्यवसाय अडचणीत सापडण्याचा धोका आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर प्रदेश तसेच सांगली, जळगाव, नाशिक आणि औरंगाबादच्या काही भागांमध्ये फटाक्यांशी संबंधित व्यवसायावर शेकडो कुटुंबं अवलंबून आहेत. दिवाळी जेमतेम काही दिवसांवर आली असताना फटाक्यांवर बंदी घातल्यास अनेकांचे प्रचंड नुकसान होईल.

कोरोना संकटातून सावरत असलेल्या महाराष्ट्रात फटाक्यांची विक्री करण्यासाठी सरकारी नियमांचे पालन करुन ठिकठिकाणी सुरक्षित गोदामांमधून कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांचा मोठा साठा करण्यात आला आहे. आयत्यावेळी बंदीचा आदेश आला तर या फटाक्यांसाठी पर्यायी बाजारपेठेचा शोध घेणे कठीण होईल. शिवाय नव्याने फटाक्यांची वाहतूक करण्यासाठी होणाऱ्या खर्चामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होईल. याच कारणामुळे फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणण्यास व्यापाऱ्यांकडून विरोध होत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत