अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतचा चुलत भाऊ नीरज सिंह बबलू यांनी ट्विट करत म्हटले की, “आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की, मुंबई पोलिस कोणत्याही प्रकारची गडबड करु नये, साक्षीदार अडचणीत येऊ नयेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत साक्षीदारांच्या सुरक्षेबाबत आणि अन्य महत्वाच्या मुद्द्यांबाबत बोलू.” साक्षीदारांसोबत कोणत्याही अनुचित घटनेची भीती व्यक्त करीत […]
मनोरंजन
Stay updated with the latest entertainment news from Maharashtra and India. Our Entertainment News section covers Bollywood, regional cinema, celebrity updates, music, TV shows, events, and everything happening in the world of entertainment.
निशिकांतच्या जाण्याने मी एक चांगला मित्र गमावला… राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना…
निशिकांत कामत यांनी सोमवारी सायंकाळी हैदराबादमधील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून निशिकांत यांना यकृताचा आजार होता, त्यांचं हेच दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होत. त्यानंतर, दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशिकांत कामत यांनी आपला […]
निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर असून मृत्यूशी झुंज सुरूच…
बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यांच्या जवळच्या मित्रानेच याबाबत माहिती दिली होती. मात्र, काही वेळाने त्यांनी या वृत्ताचं खंडन केलं. निशिकांत कामत अद्यापही व्हेंटिलेटरवर असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, अभिनेता रितेश देशमुख याने देखील ट्विट करून म्हटलं आहे की, ‘निशिकांत कामत […]
सुशांतच्या घराजवळ आढळलेल्या २ अज्ञातांचा शोध सुरू
सुशांतच्या मृत्यू नंतर मुंबई पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. काही पोलीस सुशांतच्या घरात तर काही पोलीस सुशांतचे घर ज्या इमारतीत होते त्या इमारतीच्या परिसरात उभे होते. पोलीस उपस्थित असताना दोन अज्ञात व्यक्ती इमारतीच्या परिसरात आढळल्या. या व्यक्तींपैकी एक महिला आहे आणि दुसरा पुरुष आहे. या दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर या दोन अज्ञातांमध्ये चर्चा […]
अंकिता लोखंडेनं दिलं तिच्यावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणामध्ये दररोज नवीन माहिती समोर येत आहे. एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या घराचे हप्ते सुशांत भरत होता, असा आरोप काही जणांनी लावला होता. ईडीला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने अंकितासाठी मालाडमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटची किंमत तब्बल चार कोटी ५० लाख रुपये इतकी आहे. या फ्लॅटचे ईएमआय सुशांत भरत […]
खाजगी बेट ते खाजगी जेट; रियाला हवं आहे हे सर्व..
अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणात रोज नवनवीन खुलासे, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर १५ कोटीचा घपला केल्याचा आरोप केला आहे व त्याविषयी तक्रारही नोंदवली आहे. अशातच रिया चक्रवर्तीचा एक जुना विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तिने अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तिला खरेदी करायच्या आहेत. या व्हिडिओमध्ये रिया […]
Happy Birthday Shridevi – पद्मश्रीने सन्मानित अभिनेत्री श्रीदेवीशी संबंधित काही खास गोष्टी
सौंदर्याला अभिनय आणि नृत्यविष्काराची जोड देत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज वाढदिवस . देशभरात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. एक सामान्य मुलगी ते बॉलिवुडची सुपरस्टार अभिनेत्री असा त्यांचा प्रवास आहे. श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव अय्यापान आहे जे पेशाने वकील आहेत. […]
चक्रवर्ती कुटुंबियांकडून चौकशीस सहकार्य नाही, ईडीने जप्त केले मोबाइल व लॅपटॉप
ईडीने सोमवारी सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात रिया आणि तिच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली. मात्र या चौकशीदरम्यान इंद्रजीत चक्रवर्ती आणि शोविक यांनी सहकार्य न केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या चौकशीनंतर ईडीने रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती आणि भाऊ शोविक यांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. रिया आणि शोविक या दोघांचे आयपॅड, तसंच रियावर मनी लॉड्रिंग […]
ज्येष्ठ शायर राहत इंदौरी काळाच्या पडद्याआड
प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. राहत इंदौरी यांना अरबिंदो इस्पितळात नेण्यात आलं होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांचं निधन झालं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर राहत इंदौरी यांनी ट्विट करत सांगितलं होतं, “कोविडची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच माझी करोना चाचणी करण्यात आली. करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला अरविंदो रुग्णालयात […]
अभिनेता संजय दत्त यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निदान
काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. संजय दत्तची करोना चाचणीही झाली होती. ज्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. संजय दत्तला डिस्चार्ज देण्यात आला होता, आता त्याला लंग कॅन्सर झाला आहे. अभिनेता संजय दत्तने एक ट्विट करुन कामातून ब्रेक घेत आहोत असं म्हटलं होतं. हा ब्रेक वैद्यकीय उपचारासाठी हा ब्रेक असून मी […]










