Happy Birthday Shridevi – पद्मश्रीने सन्मानित अभिनेत्री श्रीदेवीशी संबंधित काही खास गोष्टी

मनोरंजन महिला विशेष

सौंदर्याला अभिनय आणि नृत्यविष्काराची जोड देत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज वाढदिवस . देशभरात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. एक सामान्य मुलगी ते बॉलिवुडची सुपरस्टार अभिनेत्री असा त्यांचा प्रवास आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव अय्यापान आहे जे पेशाने वकील आहेत. त्यांच्या आईचे नाव राजेश्वरी आहे. त्यांना एक बहिण आणि दोन सावत्र भाऊ आहेत. बहिणीचे नाव श्रीलता आहे. आनंद आणि सतीश अशी या भावांची नावे आहेत.

श्रीदेवीने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी चित्रपटांत पाऊल ठेवले. त्यांनी ‘कंदन करुणाई’ या तमिळ चित्रपटाद्वारे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि एम. ए. थिरुमुगम यांच्या 1969 च्या पौराणिक तमिळ फिल्म थुनावन या चित्रपटाद्वारे मुख्य भूमिकेत आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली.

श्रीदेवीने 1979 मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा प्रारंभिक चित्रपट सोलवां सावन होता. पण त्यांना बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली ती हिम्मतवाला या चित्रपटापासून. 1980 आणि 1990 च्या दशकात श्रीदेवी भारतीय करमणूक उद्योगात सर्वाधिक मानधन मिळवणारी महिला म्हणून मानली गेली आणि भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वांत महान आणि प्रभावशाली अभिनेत्री म्हणून मोठ्या प्रमाणावर अजूनही मानली जाते.

श्रीदेवीने तिच्या कारकीर्दीत बऱ्याच भूमिका साकारल्या आणि पडद्यावर सशक्त महिला पात्रांची भूमिका साकारली आहे आणि मुख्य प्रवाहातील सिनेमा सोडून तिने भारतातील अनेक आर्ट फिल्ममध्येही काम केले आहे.श्रीदेवीने तिच्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी तेलुगु, तामिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले. श्रीदेवी पहिली महिला सुपरस्टार (First female Superstar) आणि भारतीय सिनेमाची मेगास्टार (Megastar) म्हणून ओळखली गेली. तिने तिच्या पाच दशकांच्या कारकिर्दीत अनेक आव्हानात्मक भूमिकांना न्याय दिला.

१९९६ मध्ये दिग्दर्शक बोनी कपूरशी लग्नानंतर श्रीदेवीने फिल्मी विश्वापासून स्वतःला दूर केले. पण यावेळी ती अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये दिसली. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना दोन मुली आहेत. जाह्नवी आणि खुशी कपूर.

श्रीदेवीला तिच्या शानदार अभिनयासाठी तीनदा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. २०१३ मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. हा देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. तसेच तिला दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत.

श्रीदेवीने २०१२ साली गौरी शिंदे यांच्या इंग्रजी विंग्लिश या चित्रपटाद्वारे पडद्यावर पुनरागमन केले होते. बरीच वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतरही इंग्रजी विंग्लिश या चित्रपटात श्री देवीने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने समीक्षक आणि प्रेक्षकांना चकित केले. त्यानंतर २०१७ मधील मॉम या थ्रिलर चित्रपटासह तिने तिचे ३०० चित्रपट पूर्ण केले.

24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईतील हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला. श्रीदेवी त्यावेळी बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेली होती, परंतु बराच वेळ झाला तरीही ती बाथरूम मधून बाहेर आली नाही, तेव्हा तिचा नवरा बोनी कपूर दरवाजा तोडून आत घुसला आणि पाहिले की ती बुडाली आहे. तिला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने श्रीदेवीच्या कुटुंबीयांना तसेच तिच्या चाहत्यांना खूप दुःख झाले होते.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Award for Best Actress) त्यांना मरणोत्तर मिळाला. २०१३ मध्ये भारतीय सिनेमाच्या शताब्दी वर्धापन दिनानिमित्त आयोजित सीएनएन-आयबीएन राष्ट्रीय सर्वेक्षणात श्रीदेवी यांना १०० वर्षातील भारतातील महान अभिनेत्री म्हणून निवडले गेले होते. तिच्या मृत्यूची बातमी भारतीय व आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये ठळकपणे दिसून आली. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत, एकही हॉलिवूड चित्रपट न करता श्रीदेवी यांना २०१८ मधील ९० व्या Academy Awards सोहळ्यादरम्यान मेमोरियम विभागात श्रद्धांजली दिली गेली.

अभिनेत्री श्रीदेवी यांना थोडक्यात घडामोडी आणि त्यांच्या सगळ्या चाहत्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत