मनोरंजन

अंकिता लोखंडेनं दिलं तिच्यावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर

अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणामध्ये दररोज नवीन माहिती समोर येत आहे. एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या घराचे हप्ते सुशांत भरत होता, असा आरोप काही जणांनी लावला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ईडीला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने अंकितासाठी मालाडमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटची किंमत तब्बल चार कोटी ५० लाख रुपये इतकी आहे. या फ्लॅटचे ईएमआय सुशांत भरत होता. सध्या अंकिता याच फ्लॅटमध्ये राहतेय. रिया चक्रवर्तीने केलेल्या दाव्यानुसार सुशांतला हा फ्लॅट रिकामा करायचा होता. परंतु अंकिता हा फ्लॅट सोडण्यास तयार नव्हती.

अभिनेत्री अंकिता लोखंडेनं या सर्व आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. अंकिता लोखंडेनं सोशल मीडयावर बँक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रे पोस्ट केली आहेत. त्यावरुन फ्लॅटचा हप्ता अंकिता स्वत: भरत असल्याचं दिसत आहे. तसेच घर घेताना बँकेच्या कागदपत्रावर अंकिता लोखंडेची खात्याची माहिती आहे. अंकिताने सर्व कागदपत्रे पोस्ट करत आरोप करणाऱ्यांचं तोंड बंद केलं आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडेने पोस्ट करताना लिहलेय की, ‘माझ्यावर होत असलेल्या आरोपाचं मी खंडन करतेय. यापेक्षा आधिक ट्रांसपेरेंट होऊ शकत नाही. माझ्या फ्लॅटचे रजिस्टर कागदपत्रे आणि बँक डिटेल्स. यामध्ये तूम्ही पाहू शकता. एक जानेवारी २०१९ ते एक मार्च २०२० पर्यंत माझ्या खात्यातून पैसे कट झाले आहेत.’ अंकिताच्या या पोस्टवर सुशांत राजपूतची बहिण श्वेता सिंह कीर्तीने कमेंट केली आहे. श्वेता म्हणते, ‘तू स्वतंत्र मुलगी असल्याचं मला माहित आहे. याचा गर्व आहे.’ काही चाहत्यांनी देखील तिच्या सपोर्टमध्ये मतं व्यक्त केली आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत