actor chandrashekhar vaidya mahamantri sumant of ramayan dies
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे निधन, रामायणात साकारली होती ‘महामंत्री सुमंत’ ची भूमिका

मुंबई : दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. रामायण मालिकेमध्ये राजा दशरथ यांचे महामंत्री सुमंत यांची भूमिका साकारणारे कलाकार चंद्रशेखर वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. Legendary Artist ChandraShekhar […]

Kannada actor Sanchari Vijay dies his family to donate his organs
मनोरंजन

अभिनेता विजय संचारी यांचे निधन, कुटुंबीयांनी घेतला अवयवदानाचा निर्णय

बेंगळुरू : राष्ट्रीय पुरस्कार विजेता कन्नड अभिनेता संचारी विजय यांचं सोमवारी (१४ जून) निधन झालं. ते ३८ वर्षांचे होते. बेंगळुरूमध्ये शनिवारी रात्री त्यांच्या बाईकचा अपघात झाला होता. या अपघातात विजय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि ते कोमात होते. मेंदूवर आपत्कालीन शस्त्रक्रिया करूनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. विजय यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयव दान करण्याचा […]

Pearl V Puri Case Rape Victim Father Says His Daughter Told The Name Of The Actor
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

पर्ल पुरीने ‘त्या’ मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप खरा, पीडितेच्या वडिलांनी केला मोठा खुलासा

मुंबई : अभिनेता पर्ल वी पुरी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी, आता पीडितेच्या वडिलांनी मोठा खुलासा केला आहे. पर्लची ओळख त्यांच्या मुलीनेच फोटो पाहून पटवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यापूर्वी पीडितेच्या आईने पर्ल निर्दोष असल्याचं सांगत मुलीचा ताबा मिळवण्यासाठी पीडितेचे वडील खोटे आरोप करत […]

No ban on proposed films on late actor Sushant Singh Rajput's life: Delhi HC
मनोरंजन

“न्याय: द जस्टीस” चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली सुशांतच्या वडिलांची याचिका

नवी दिल्ली : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या वडिलांनी सुशांतच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली आहे. एप्रिल महिन्यात सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी ही याचिका दाखल केली होती. सुशांतच्या वडिलांनी युक्तिवाद केला होता की सुशांतच्या खाजगी जीवनाचे कोणतेही […]

Casting director-producer Seher Aly Latif passes away
मनोरंजन

बॉलिवूडला मोठा धक्का, कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे निधन

मुंबई : बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंतच्या चित्रपटात आणि वेब शोमध्ये कलाकारांच्या कास्टिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या कास्टिंग डायरेक्टर सेहर अली लतीफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सेहर लतीफ यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही आणि सोमवारी त्यांचे निधन झाले. सेहर लतीफ यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली […]

'Sarabhai Versus Sarabhai' fame actress Tarla Joshi passes away
मनोरंजन

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन

मुंबई : अभिनेत्री तरला जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’, ‘एक हजारों में मेरी बहना है’ यासह अनेक मालिकांमध्ये त्यांनी भूमिका निभावल्या आहेत. अभिनेत्री निया शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. नियाने तरला जोशी यांच्यासोबत ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेत काम […]

naagin 3 fame tv actor pearl v puri arrested
मनोरंजन

‘नागीण 3’ फेम अभिनेता पर्ल पुरीला बलात्कार प्रकरणात अटक, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई : मालाडमधील मालवणी पोलिसांनी नागीण 3 फेम टीव्ही अभिनेता पर्ल व्ही पुरी याच्यासह पाच जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पर्लसह सहा आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. या प्रकरणात पीडितेने पोलिसांकडे जबाब नोंदवला असून पॉक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीने सांगितले की, आधी तिच्यावर कारमध्ये […]

rapper mc kode aka aditya tiwari allegedly goes missing after shared a cryptic post
मनोरंजन

रॅपर एमसी कोड उर्फ ​​आदित्य तिवारी बेपत्ता, त्याची शेवटची पोस्ट सुसाइड नोट असल्याचा फॉलोअर्सचा दावा

नवी दिल्ली : रॅपर एमसी कोड उर्फ ​​आदित्य तिवारी बुधवारी नवी दिल्लीहून बेपत्ता झाला आहे. त्याने सोशल मीडियावर आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये आत्महत्येचे संकेत दिले होते. गेल्या काही दिवसांपासून त्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तो वादात सापडला होता, ज्यात त्याने हिंदू महाकाव्य महाभारतावर आक्षेपार्ह भाष्य केले होते. त्याच्या या टिप्पणीवर सोशल मीडियातून तीव्र विरोध झाला. […]

actress yami gautam ties the knot with best friend aditya dhar
मनोरंजन

अभिनेत्री यामी गौतमने केलं लग्न, चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का

मुंबई : अभिनेत्री यामी गौतमने इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर करत तिच्या लग्नाची घोषणा केली आहे. तिने तिचा जिवलग मित्र आदित्य बरोबर लग्न केले आहे. यामीने कधीही त्यांच्या दोघांच्या नात्याविषयी उघडपणे काहीही सांगितले नव्हते, त्यामुळे ही बातमी तिच्या चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. यामीने कॅप्शनसह एक फोटो पोस्ट करत लिहिले कि, “आमच्या कुटुंबियांच्या आशीर्वादाने आम्ही आज लग्नाच्या […]

sushant singh rajput
मनोरंजन

NCB ची मोठी कारवाई, सुशांतला ड्रग्ज पोहोचवणारा ड्रग पेडलर हरीश खानला अटक

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) हाती त्याच्यापर्यंत ड्रग्ज पोहोचवणारा ड्रग पेडलर लागला आहे. हरीश खान नावाच्या या ड्रग पेडलरला एनसीबीने वांद्रेमधून अटक केली आहे. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 28 मे रोजी सुशांत सिंह राजपूतचा रूम पार्टनर आणि जवळचा मित्र सिद्धार्थ पीठानीला हैदराबादमधून अटक केली होती. एनसीबीने नीरज […]