सौंदर्याला अभिनय आणि नृत्यविष्काराची जोड देत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज वाढदिवस . देशभरात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. एक सामान्य मुलगी ते बॉलिवुडची सुपरस्टार अभिनेत्री असा त्यांचा प्रवास आहे. श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव अय्यापान आहे जे पेशाने वकील आहेत. […]
मनोरंजन
Stay updated with the latest entertainment news from Maharashtra and India. Our Entertainment News section covers Bollywood, regional cinema, celebrity updates, music, TV shows, events, and everything happening in the world of entertainment.
दुःखद! ‘मन की आवाज : प्रतिज्ञा’ फेम अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन
मुंबई : अभिनेते अनुपम श्याम ओझा यांचे आज (8 ऑगस्ट) निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. अभिनेता अनुपम श्याम सुमारे सहा दिवसांपासून रुग्णालयात होते. त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याने आज रात्री 8 वाजता निधन झाले. अनुपम श्याम टीव्ही शो ‘मन की आवाज : प्रतिज्ञा’ मधील त्यांच्या ठाकूर सज्जन सिंह या भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांनी स्लमडॉग […]
राज कुंद्राच्या अडचणीत आणखी भर, बॉलिवूड अभिनेत्रीने राज कुंद्रावर केले गंभीर आरोप
नवी दिल्ली : उद्योगपती राज कुंद्रा याला मुंबई गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात अटक केली. त्याने त्याच्या ऍपवर अश्लील व्हिडीओ तयार करून ते प्रसारित केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्यातच या प्रकरणाचा तपास पुढे जात असतानाच अनेक अभिनेत्री आणि मॉडेल समोर येऊन राज कुंद्रावर अनेक धक्कादायक आरोप करत आहेत. आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने राज […]
गुलशन ग्रोव्हर यांची धोनीच्या लूकवर प्रतिक्रिया, धोनीला केले ‘हे’ आवाहन
बॉलिवूडचा बॅडमॅन उर्फ गुलशन ग्रोव्हर हे वास्तविक जीवनात अतिशय नम्र व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नेहमीच वादांपासून दूर राहण्यात यश मिळवले आहे. पण आता कॅप्टन कूल एमएस धोनीमुळे त्यांना वेगळीच चिंता सतावत आहे. याला कारण आहे धोनीची फॉक्स हॉक हेअरस्टाईल. प्रत्येकजण धोनीच्या नवीन लूकचा आनंद घेत असताना, गुलशन ग्रोव्हर यांनी देखील धोनीच्या लूकवर मजेशीर […]
आरोग्याचे नियम पाळून शिस्तबद्ध रितीने चित्रीकरण करावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण कोविडविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे, यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही. विशेषत: मुंबई आणि परिसरात निर्मात्यांनी चित्रीकरणाचे स्थळ व वेळ याबाबत पोलिसांशी योग्य तो समन्वय ठेवावा आणि आपल्या पथकातील कलाकार व लोकांची नियमित कोविड तपासणी करावी, लसीकरण होईल हे पाहावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]
टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
मुंबई : टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण कुमारने आगामी प्रकल्पात नोकरी देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा दावा एका महिलेने केला आहे. याप्रकरणी भूषण कुमार यांच्याविरूद्ध मुंबईच्या डी एन नगर पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूषण कुमार याच्याविरोधात भारतीय दंड संहिताच्या कलम 376 नुसार बलात्काराचा […]
ब्रेकिंग : ‘बालिका वधू’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे मॅनेजर विवेक सिधवानी यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. त्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. शुक्रवारी सकाळी सुरेखा सिक्री यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. माध्यमांशी शेअर केलेल्या एका निवेदनात त्यांच्या मॅनेजरने सांगितले की, “अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे आज सकाळी वयाच्या 75 व्या […]
अभिनेत्री दिया मिर्झाला पुत्ररत्न, 6 व्या महिन्यातच जन्माला आलं बाळ
मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा नुकतीच आई झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच दियाने उद्योजक वैभव रेखीसोबत दुसरं लग्न केलं होतं. दिया आणि वैभव यांना मुलगा झाला आहे. त्याचं नावही त्यांनी जाहीर केलं आहे. दियाच्या बाळाचा जन्म 14 मे रोजीच झाला होता. पण ते बाळ 6 व्या महिन्यातच जन्माला आल्यामुळे प्रिमॅच्युअर बेबी म्हणून डॉक्टरांच्या देखरेखीखाली होतं. आता […]
सुपरस्टार विजय याला १ लाख रुपयांचा दंड, न्यायमूर्तींनी केली ‘ही’ टिपण्णी
चैन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय याने २०१२ मध्ये इंग्लंडवरून एक महागडी गाडी मागवली होती. या गाडीची किंमत ७ कोटी ९५ लाख रुपये होती. मात्र गाडी विकत घेताना विजयने गाडीसाठी द्यावा लागणारा कर भरला नाही, तर करमाफी मिळावी यासाठी त्याने सरकारकडे विनंती केली होती. आता यावर मद्रास न्यायालयाकडून निर्णय आला असून अभिनेत्याला कर न भरल्यामुळे १ […]
ढगफुटीनंतर बेपत्ता झालेले सूफी गायक मनमीत सिंग यांचा मृतदेह सापडला, चाहत्यांना मोठा धक्का
धरमशाला : सोमवारी धरमशालामध्ये ढगफुटी झाल्यानंतर बेपत्ता झालेले सूफी गायक मनमीत सिंग यांचा मृतदेह सापडला आहे. मनमीत यांच्या मुत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत असून हा त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. मनमीत पंजाबच्या अमृतसरमधील होते. मनमीत यांच्या मृत्यूमुळे ‘सैन ब्रदर्स’ ची जोडीही फुटली. मंगळवारी संध्याकाळी उशिरा कांग्रा येथील कारेरी तलावाजवळील एका खड्ड्यात मनमीत यांचा […]










