Get complete information about Covid Hospital, available beds in Pune
कोरोना पुणे महाराष्ट्र

महत्वाची माहिती! पुण्यातील कोविड हॉस्पिटल, उपलब्ध बेड ही संपूर्ण माहिती मिळवा एका क्लीकवर

पुणे : पुण्यातील नागरिकांसाठी ही अतिशय महत्वाची माहिती आहे. आपण एका क्लीकवर पुण्यातील कोविड हॉस्पिटलची परिस्थिती, उपलब्ध बेड, ऑक्सिजन चे बेड तसेच व्हेंटीलेटरसह असलेले ICU आणि व्हेंटीलेटरविना उपलब्ध असलेले ICU या बद्दलची संपूर्ण माहिती मिळवू शकता. https://covidpune.com/ या वेबसाइट सर्व माहिती उपलब्ध आहे. कोरोना संसर्ग आणि एकूण परिस्थिती भीषण होत असून सर्वांनी आवश्यक काळजी घ्यावी. […]

Frames of crematorium furnaces in Surat melt due to rush of bodies
कोरोना देश

कोरोनाचं भयावह रूप.. 24 तास अंत्यसंस्कार सुरु असल्याने वितळली विद्युतदाहिन्यांची धुराडी आणि मेटल फ्रेम

सुरत : कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या धडकी भरवणारी असून सर्वत्र हाहाकार माजला आहे. गुजरातमध्येही भयंकर परिस्थिती ओढवलेली दिसत आहे. सुरतमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढला आहे. यामुळे स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर प्रचंड ताण पडत असून उष्णतेमुळे विद्युतदाहिन्यांची धुराडी तसेच गॅस फर्नेसच्या मेटल फ्रेम देखील वितळल्या आहेत. मृतांची संख्या प्रचंड असल्याने सुरतच्या स्मशानभूमींमध्ये 24 तास […]

Russia's Sputnik V Covid-19 vaccine gets approval for restricted use in India
कोरोना देश

ब्रेकिंग : केंद्र सरकारकडून रशियाच्या स्पुटनिक-व्ही कोरोना लसीला मंजुरी

केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक-व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजूरी दिली आहे. या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सोमवारी मंजुरी देण्यात आली. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन नंतर भारताने मंजूर केलेली ही तिसरी लस आहे. स्पुटनिक-व्ही ही लस रशियातील गॅमालेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने विकसित केलेली आहे. And Sputnik V is approved. #covid #vaccine https://t.co/6CCX9oA0qJ — Teena Thacker […]

centre prohibits exports of injection remdesivir till the covid situation in the country improves
कोरोना ग्लोबल देश

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रेमेडेसिव्हीरची निर्यात थांबवण्याचे निर्देश

नवी दिल्ली : देशात जोपर्यंत कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशातील अनेक ठिकाणी औषधांचा तुटवडा जाणवतो आहे. रेमेडेसिव्हीर हे औषध न […]

कोरोना महाराष्ट्र

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीच कडक निर्बंध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत असून या संकटाला सामोरे जायचे असेल, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक निर्बंध आवश्यकच आहेत पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डायमंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. शासनाच्या […]

Prime Minister Narendra Modi took the second dose of corona vaccine
कोरोना देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी नियमानुसार कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांनी स्वतःच ट्विट करत ही माहिती दिली. भारतात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत सहभागी होत नरेंद्र मोदींनी १ मार्च रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस घेतली. ते म्हणाले कि, “आज मी एम्समध्ये कोविड […]

mpsc exam date will be announced tomorrow says cm Uddhav Thackeray
कोरोना महाराष्ट्र

राज्यात फेब्रुवारी पासून आतापर्यंत तीस पट रुग्णसंख्या वाढली, लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया, असे आवाहन आज केले. तसेच लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे पाऊल कोरोना संसर्गाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. तसेच त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभीर्याने विचार करून […]

Ncp Opposes Lockdown In Maharashtra
कोरोना पुणे महाराष्ट्र

पुणे शहरातील सर्व दुकाने बंद, व्यापारी महासंघाने घेतला हा महत्वपूर्ण निर्णय..

पुणे : पुणे शहरातील सर्व दुकाने मंगळवारी, आजपासून बंद करण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे. त्या दरम्यान शहरातील सर्व व्यापारी महासंघाचे सदस्य असलेल्या व्यापारी संघटनांचे ४५ वर्षापुढील कामगार, व्यापारी, त्यांच्या कुटुंबीयांना लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने आपले ‘ब्रेक द चेन’ आदेश जारी केल्यानंतर आता नंतर पुणे महापालिकेने सायंकाळी सर्व […]

Central government decision to allow all private hospitals for corona vaccination
कोरोना देश

कोरोना लसीकरणासाठी सरकारी-खासगी कर्मचाऱ्यांना सुट्टी, राज्य सरकारचा निर्णय

लखनऊ : कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून सुट्टी देण्यात येणार असल्याचं उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनं जाहीर केलंय.  तर इयत्ता आठवीपर्यंतच्या शाळा पुढच्या रविवारपर्यंत अर्थात ४ एप्रिलपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.  माध्यमिक आणि उच्च शिक्षण संस्था सुरू राहतील. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, लसीकरण मोहिमेत […]

80 Percent Of Private Hospital Beds Are Reserved For Corona Patients Decision Of Pune Municipal Corporation
कोरोना पुणे महाराष्ट्र

पुणे महापालिकेचा मोठा निर्णय, खासगी हॉस्पिटलमधील ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव..

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून पुण्यातील रुग्णालयांमध्ये आता बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी पुणे महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता खासगी रुग्णालयात तब्बल ८० टक्के बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत ही महत्वाची […]