कोरोना

आता तीन पेक्षा अधिक करोना रुग्ण आढळून आल्यानंतरच पूर्ण इमारत सील केली जाणार

मुंबई महापालिकेनं करोना रुग्ण आढळून येणाऱ्या बिल्डिंग सील करण्याच्या नियमात बदल केला आहे. “एका बिल्डिंगमध्ये जर तीन किंवा त्यापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळून आले, तर महापालिका प्रशासनाकडून संपूर्ण बिल्डिंग सील केली जाईल. तीन पेक्षा कमी रुग्ण असतील, तर महापालिका अधिकाऱ्यांकडून संबंधित मजला सील केला जाईल. बिल्डिंगमधील इतर रहिवाशांवर बाहेर ये-जा करण्यावर कसलीही बंधन असणार नाही,” […]

कोरोना ग्लोबल

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ’ब्रायन यांना करोनाची लागण

अमेरिकेत कोरोनाचं थैमान असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला करोनाची लागण झाली आहे. सीएनएनने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ’ब्रायन यांना करोनाची लागण झाली असल्याचं वृत्त दिलं. पहिल्यांदाच ट्रम्प प्रशासनातील उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि रॉबर्ट ओ’ब्रायन यांच्यात शेवटची भेट कधी झाली होती हे अद्याप स्पष्ट नाही. १० जुलैला […]

कोरोना क्रीडा देश

इडन गार्डन्स मैदानातील गॅलरी भागात कोविड सेंटरची उभारणी करण्याचे काम सुरु

कोलकाता शहरातली वाढती करोनाबाधित रुग्णसंख्या पाहता, ऐतिहासीक इडन गार्डन्स मैदानाचा वापर आता कोविड सेंटर म्हणून करण्यात येणार आहे. इडन गार्डन्स मैदानातील गॅलरी भागात कोविड सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. कोलकाता पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशनला याबद्दल परवानगी मागितली होती. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या परवानगी नंतर कोविड सेंटर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच हे सेंटर […]

कोरोना देश

देशातले शास्त्रज्ञ करोनाविरोधी लस शोधण्यासाठी वेगाने काम करत आहेत-पंतप्रधान मोदी

आपल्या देशातले शास्त्रज्ञ करोनावर लस शोधण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत आहेत असं मोदींनी म्हटलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातल्या मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथील हायटेक लॅबचे उद्घाटन केले. त्यानंतर ते बोलत होते. सुरुवातीला आपल्या देशात करोनाच्या चाचण्या करण्यासाठी एकच लॅब होती. आता संपूर्ण देशात १३०० लॅब्स आहेत. तर देशभरात पाच लाख टेस्ट रोज होत […]

कोरोना ग्लोबल देश

अमेरिकन विद्यापिठाने केला दावा, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये लपवण्यात येतेय करोनाबाधितांची आकडेवारी

अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी भारतातील सर्व राज्यांच्या करोनासंदर्भातील आकडेवारीचा सखोल अभ्यास करून अहवाल मांडला आहे. यात कर्नाटकने करोनासंदर्भातील आकडेवारीची नोंद योग्य प्रकारे ठेवल्याचे संशोधकांनी म्हटलं व कर्नाटक सरकराच कौतुक केलं आहे. तर बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांनी या संदर्भात सर्वात वाईट कामगिरी केल्याचेही या अभ्यासामध्ये नमूद करण्यात आलं. ‘मेडरिक्सिव’ या आरोग्यासंदर्भातील ऑनलाइन माध्यमावरील प्रकाशनामध्ये […]

कोरोना महाराष्ट्र

पुण्यात 24 जुलैपासून लॉकडाउन नसलं तरीही निर्बंंध मात्र कायम

पुण्यात 24 जुलैपासून लॉकडाउन नसलं तरीही निर्बंंध मात्र कायम ठेवण्यात आले आहेत, असं पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केलं.  65 वर्षे वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुलं यांना अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य विषयक अडचणींशिवाय बाहेर जाता येणार नाही. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा, किराणा, भाजीपाला विक्री, […]