Ncp Opposes Lockdown In Maharashtra

पुणे शहरातील सर्व दुकाने बंद, व्यापारी महासंघाने घेतला हा महत्वपूर्ण निर्णय..

कोरोना पुणे महाराष्ट्र

पुणे : पुणे शहरातील सर्व दुकाने मंगळवारी, आजपासून बंद करण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे. त्या दरम्यान शहरातील सर्व व्यापारी महासंघाचे सदस्य असलेल्या व्यापारी संघटनांचे ४५ वर्षापुढील कामगार, व्यापारी, त्यांच्या कुटुंबीयांना लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राज्य सरकारने आपले ‘ब्रेक द चेन’ आदेश जारी केल्यानंतर आता नंतर पुणे महापालिकेने सायंकाळी सर्व प्रकारची दुकाने, मार्केट व मॉल बंद राहतील, असे आदेश जारी केले आहेत. त्यात अत्यावश्यक सेवा वस्तूंच्या दुकानांच्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यापारी, मालक, कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्याची सूचना महापालिकेने आदेशात केली. त्यानुसार व्यापारी महासंघाने पाऊल उचलले आहे.

राज्य सरकारपाठोपाठ पुणे महापालिकेने सोमवारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. सरकारच्या आदेशाविरोधात आंदोलन करता येऊ शकते. त्या आदेशाचे उल्लंघन सद्यस्थितीत करणे योग्य ठरणार नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मागील लॉकडाउन व्यापाराचे कंबरडेच मोडले होते. अनेक व्यवसाय ठप्प झाले होते, तसेच अनेकांचा रोजगार गेला होता. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन नको असे प्रत्येकाचे मत बनले होते. आता पुन्हा एकदा व्यापाऱ्यांवर दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे.

यावेळी मात्र सरकारला सहकार्य करण्याचे व्यापाऱ्यांचे धोरण असल्याचे दिसत आहे. एकीकडे व्यवसाय तोट्यात जात असताना आणि समोर सण, उत्सव असताना दुकाने बंद करण्याची वेळ येत आहे. व्यापाऱ्यांमुळे करोनाचा संसर्ग पसरत नाही. पण नाईलाजास्तव सरकार, महापालिकेच्या आदेशामुळे आम्ही मंगळवारपासून दुकाने बंद टेवण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत