IPL 2020 : सनराईजर्स हैदराबाद संघाचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार यंदा दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीये. शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात खेळत असताना भुवनेश्वरला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला १९ वं षटक पूर्ण टाकता आलं नाही. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सांगितले कि भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे पुढील सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. संघाचा प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर गेल्यामुळे याचा फटका […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
‘तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता’ असे म्हणत कोळी भगिनी कृष्णकुंजवर
मुंबईतल्या डोंगरी भागातील कोळी भगिनींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या महिला कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आल्या होत्या. “राजसाहेब बेकायदा मासे विक्रेत्यांना हटवा, परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने आमच्या पोटावर पाय येतो आहे. आमचा व्यवसाय मंदावला आहे तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता” अशी मागणी त्यांनी केली. राज ठाकरें यांनी या कोळी […]
धोनीने चेन्नईच्या यशात प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांच्या योगदानाबद्दल मानले आभार
आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग तीन पराभवांनंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने दमदार पुनरागमन केलं आहे. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने पंजाबवर १० गडी राखून मात केली. विजयासाठी आवश्यक असलेल्या १७९ धावा चेन्नईने सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु-प्लेसिस यांच्या जोरावर पूर्ण केल्या. गेल्या काही सामन्यांपासून अपयशी ठरणाऱ्या शेन वॉटसनला या सामन्यात सूर गवसला. वॉटसनने आपल्या अर्धशतकी […]
मायावती यांनी योगी सरकारला दिला अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलण्याचा सल्ला
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी हाथरस प्रकरणात सरकारच्या भूमिकेसंदर्भात ट्विट केलं आहे. “हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी व सर्व माहिती घेण्यासाठी तिथे २८ सप्टेंबर रोजी सगळ्यात आधी बसपाचं शिष्टमंडळ गेलं होतं. मात्र, पोलीस ठाण्यात बोलवूनच त्यांचा संवाद घडवून आणण्यात आला. या संवादानंतर मिळालेला अहवाल अत्यंत दुःखदायक होता. ज्याने मला माध्यमांकडे जाण्यास […]
जेईई अॅडव्हान्स २०२० परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर देशात प्रथम
जेईई अॅडव्हान्स २०२० परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर हा आयआयटी मुंबई विभागातील विद्यार्थी देशात प्रथम आला आहे. एकूण १ लाख ५० हजार ८३८ विद्यार्थांनी ही परीक्षा दिली होती. पेपर १ आणि २ साठी एकूण ४३ हजार २०४ विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स २०२० साठी पात्र ठरले होते. चिराग फलोर हा या परीक्षेत […]
गुरुग्राममध्ये २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार
गुरुग्राम : एका २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. गुरुग्रामधील डीएलएफ फेज २ परिसरातील एका रियल इस्टेट डीलरच्या कार्यालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचार करतेवेळी या महिलेस अमानुष मारहाण देखील केली गेली. यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या […]
राष्ट्रवादी काँग्रेस: LGBT सेल सुरू करणारा पहिलाच पक्ष
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षाचा एलजीबीटी सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, एलजीबीटी समुदायाचा पक्षातंर्गत सेल करणारा राष्ट्रवादी पहिलाच पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध समुदायासाठी अनेक सेल आहेत. आता राष्ट्रवादीनं परिवर्तनवादी व क्रांतिकारी निर्णय घेत एलजीबीटी सेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या विविध सेलमध्ये एल.जी.बी.टी. हा […]
मुंबई मनपात तिरंगी लढत; शिवसेना, काँग्रेस, भाजपची टक्कर
मुबई : कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या अनेक निवडणुका आता टप्प्याटप्प्याने होण्याची चिन्ह दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेत सोमवारी ५ ऑक्टोबर रोजी स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीत शिवसेना , काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत दिसणार आहे. मनपाचे २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे बजेट ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचे आहे. पालिकेचे सर्व […]
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी घेतली हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी आज उत्तर प्रदेशातील हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत असलेल्या उत्तर प्रदेशात हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेनं खळबळ उडवून दिली. संपूर्ण देशाचं लक्ष सध्या हाथरसमधील घडामोडींकडं लागलं आहे. या घटनेमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला विरोधकांनी घेरलं आहे. सोशल मीडियातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय […]
अभिनेत्री तमन्ना भाटीयाला करोनाची लागण
अभिनेत्री तमन्ना भाटीयाला करोनाची लागण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तपन्नाला ताप आला होता. तसेच तिला करोनाची सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे करोनाची चाचणी करुन घेतली आणि ती पॉझिटीव्ह आली. ती सध्या हैद्राबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी तमन्नाने ट्विट करत तिच्या आई-वडिलांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले होते. तिने पोस्टमध्ये तिच्या आई-वडिलांमध्ये […]










